Govt scheme : विजाभज, विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना नेमकी काय आहे ?

विजाभज, विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना

योजनेचा उदेश(OBJECTIVE OF THE SCHEME)

विजाभज तसेच विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना ही योजना लागू करण्यात आली आहे. माध्यमिक शाळेतील हुशार व गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता ही योजना सुरू करण्यात आली आहे.

योजनेच्या अटी(Terms of the scheme)

• विद्यार्थी विजाभज तसेच विमाप्र या प्रवर्गातील असावा.
• विद्यार्थी पाचवी ते दहावीमध्ये शिकणारा असावा.
• गतवर्षी वार्षिक परीक्षेत ५० टक्के पेक्षा जास्त गुण घेऊन वर्गात प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा.

लाभाचे स्वरूप(Nature of benefit)

योजनेत लाभान्वित पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह २० रूपये १० महिन्यासाठी २०० रूपये व आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दरमाह ४० रूपये याप्रमाणे १० महिन्यासाठी ४०० रूपये शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकानी पात्र विद्यार्थ्याचे प्रस्ताव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयास सादर करणे गरजेचे आहे.

संपर्क: जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद/ संबंधित शाळेचे मुख्याध्यापक