Govt Scheme : अल्पसंख्यांक समुहातील महिलांसाठी असणारी स्वयंसहाय्यता बचत गट योजना नेमकी काय आहे ?

योजनेचा उद्देश

■अल्पसंख्यांक समाजातील महिलांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सक्षम बनविणे. (Govt Scheme: What exactly is the scheme for women belonging to minority groups?)

■अल्पसंख्यांक समाजातील महिलांच्या स्थायी विकासासाठी स्वयंसहाय्य बचतगट बांधणी करून स्वमदतीसाठी महिलांना बळकट करणे.

योजनेची अंमलबजावणी

■ महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्यामार्फत राज्यातील मुंबई, नांदेड, मालेगाव, कारंजा, परभणी, पुणे, नागपूर, औरंगाबाद, भिवंडी, मुंब्रा-कौसा व मिरज या शहरांमध्ये राबविण्यात येते.

■ या योजनेसाठी शासनामार्फत महिला आर्थिक विकास महामंडळाला निधी देण्यात येतो.

योजनेसाठी आवश्यक

■बचत गट प्रमुखाचा थोडक्यात परिचय

■बचत गटाच्या मागील दोन ते तीन वर्षांच्या आर्थिक व्यवहाराचा जमाखर्चाचा तपशील.

■विविध शासकीय विभागाकडून बचत गटास मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती.

■बचत गटातील कर्ज घेऊ इच्छिणाऱ्या सभासदांच्या जातीचे, उत्पन्नाचे दाखले प्राधिकृत सक्षम अधिकाऱ्यांची स्वाक्षरी.

■ बचत गटातील सभासदांचे रंगीत छायाचित्र.

■ दारिद्र्यरेषेखालील उमेदवारांनी दारिद्र्यरेषेखाली असल्याबाबतचे प्राधिकृत अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक.

संपर्क: महिला आर्थिक विकास महामंडळ, ४७, अशोक बलकवडे मार्ग, नवी पेठ, सदाशिव पेठ, पुणे