पंतप्रधानाच्या आयुष्यावरील चित्रपट बॉक्स ऑफिसवर का फेल होतात ?  

भावना संचेती – चित्रपट (Movie)हे असं माध्यम आहे की ते अगदी सहज रित्या सर्वसामान्य लोकांपर्यत पोहचतं. विविध विषय , पुस्तके आणि व्यक्ती यांच्यावर चित्रपट बनविले जातात. काही चित्रपट खूप चालतात तर काही चित्रपट तितकीशी कमाई करू शकत नाहीत. अगदी काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा घोषणा करण्यात आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या आयुष्यावर एक बायोपिक (Biopic)बनविण्यात येणार आहे. नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान नाहीत ज्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविण्यात येणार आहे. याआधी देखील असे प्रयत्न करण्यात आले आहेत परंतु ते चित्रपट तितकेसे चालले नाहीत. आज आपण पाहणार आहोत असे कोणते पंतप्रधान आहेत ज्यांच्या आयुष्यावर चित्रपट बनविले गेले आहेत आणि त्यांना हवा तितका प्रतिसाद मिळालेला नाही.

द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर- सोनिया गांधी (The Prime Minister -Sonia Gandhi) यांनी २००४ साली अचानक पंतप्रधान पद स्वीकारण्यास नकार देतात आणि अचानक कॉंग्रेस मधील अत्यंत हुशार अर्थ तज्ञ डॉ. मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांचे नाव पंतप्रधान पदासाठी चर्चेत येते. तेव्हा सुरू झालेला प्रवास द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर या चित्रपटात मांडण्यात आला आहे. पत्रकार संजय बारू लिहीत द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर (The Accidental Prime Minister) या पुस्तकावरून हा चित्रपट बनविण्यात आला. या चित्रपटांवर टीकादेखील खूप झाली. सुनील बोहरा, धवल गाडा यांची निर्मिती तर विजय रत्नाकर गुट्टे यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटांमध्ये अनुपम खेर यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका केली होती. हा चित्रपट संपूर्णपणे सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भूमिका अनुपम खेर,अक्षय खन्ना,सुझॅन बर्नेर्ट,अर्जुन माथूर,दिव्या सेठ,विपीन शर्मा  इत्यादी  भूमिका केल्या होत्या. कॉंग्रेसच्या काळात जे घोटाळे झाले , जे वाद झाले यासर्व बाबींवर या चित्रपटाद्वारे भाष्य करण्यात आले होते. हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा कॉंग्रेसच्या बाजूने या चित्रपटावर फार टीका करण्यात आली. बॉक्स ऑफिसवर (Box Office) हा चित्रपट  चांगला चालला. या चित्रपटाने प्रेक्षकांना शेवतपर्यत खिळवून ठेवले. पण या चित्रपटाद्वारे अनेक मुडद्यांवर प्रश्न देखील उभे केले

पीएम नरेंद्र मोदी- २४ मे २०१९ रोजी हा चित्रपट रिलीज झाला. अवघ्या २ दिवसांपूर्वी म्हणजे २२ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून निवडून आले होते. एक सामान्य चहावाला ते जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाचा  पंतप्रधान हा नरेंद्र मोदी यांचा प्रवास दाखविणारा हा चित्रपट होता. त्यावेळेस अगदी मोदी लाट सुरू होती. त्यामुळे सर्वांनी एक अंदाज वर्तविला होता तो म्हणजे हा सिनेमा फार कमाई करेल पण तसे काहीच झाले नाही. उलट या सिनेमाकडे लोकांनी अक्षरक्षा पाठ फिरवली.  विवेक ओबेरॉय  याने नरेंद्र मोदी याची भूमिका निभावली होती. यामध्ये इंदिरा गांधी ते अगदी राहुल गांधी यांच्यापर्यत सर्व गांधी घराणे देखील दाखविण्यात आले होते. हा चित्रपट लोकसभा निवडणुकी पूर्वीच प्रदर्शित होणार होता पण काही विरोधी पक्षांनी या चित्रपटाला विरोध केला. त्यामुळे या चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. पण नंतर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे हा चित्रपट अधिक फ्लॉप झाला असावा असे देखील म्हटले जाते.