Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीच्या काचा फोडल्या, मराठा आंदोलकांचा हल्लाबोल

Gunratna Sadavarte Car Sabotage: काही दिवसांपूर्वी वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) लढत असलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना अटक करण्याची भाषा केली होती. यामुळे मराठा समाजात गुणरत्न सदावर्तेंबद्दल रोष होता. त्या रागातूनच गुरुवारी सकाळी काही आंदोलकांनी सदावर्ते यांच्या गाडीच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला आहे. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. याठिकाणी हा प्रकार घडला.

गुरुवारी काही अज्ञातांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या आलिशान गाडीच्या एका बाजूच्या सर्व काचा पूर्णपणे फोडल्या आहेत. हा प्रकार लक्षात आल्यानंतर या गाडीवर काळा कपडा टाकून ती झाकण्यात आली. या गाडीसोबत गुणरत्न सदावर्ते यांच्या मालकीची आणखी एक गाडी फोडण्यात आली आहे. सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरुवात केली आहे.

पोलिसांनी याप्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. मंगेश साबवे, वसंत बनसोडे, राजू सावे अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. हे तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट