एनसीबीच्या पथकाने जुन्नर, शिरूर परिसरात छापा टाकून २०० किलो अल्प्राझोलम केले जप्त 

Pune – ससून रुग्णालयातून (Sasun Hospital) अमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा सूत्रधार ललित पाटील (Lalit Patil) याने पलायन केल्याच्या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. ससून रुग्णालयातील अमली पदार्थांच्या प्रकरणानंतर रुग्णालयातील अनेक प्रकरणे समोर आली. रुग्णालयातील कैद्यांच्या कक्षात अनेक कैदी महिनोंमहिने पाहुणचार घेत असल्याचेही यानिमित्ताने समोर आले. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप देखील होत असून ललित पाटीलला अटक करण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर आहे.

दरम्यान, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील, त्याचा भाऊ भूषण, साथीदार अभिषेक बलकवडे यांनी नाशिकजवळील शिंदे गावात मेफेड्रोन तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. मुंबई पोलिसांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकून कोट्यवधी रुपयांचे मेफेड्रोन, तसेच मेफेड्रोन तयार करण्यासाठी लागणारे रासायनिक पदार्थ जप्त केले होते.

जुन्नर, शिरूर तालुक्यात अल्प्राझोलमची बेकायदा निर्मिती होत असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने जुन्नर, शिरूर परिसरात छापा टाकून २०० किलो अल्प्राझोलम जप्त केले. एनसीबीच्या पथकाने याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांना दिली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या-

…तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचा इशारा

मी अजितदादांना विनंती करतो छगन भुजबळांना जरा समज द्या,नाहीतर ते – जरांगे पाटील

मराठ्यांच्या ढाण्या वाघाची डरकाळी; मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा