Gurugram Sector-90 | माउथ प्रेशनर तोंडात घेताच झाल्या रक्ताच्या उलट्या, रेस्टॉरंटमधील घटनेमुळे चार जण आयसीयूत

गुरुग्राममधील सेक्टर-90 (Gurugram Sector-90) मध्ये असलेल्या बार आणि रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलेल्या पाच जणांना जेवणानंतर माऊथ फ्रेशनर (Mouth freshener) वापरणे खूप महागात पडले आहे. रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना माऊथ फ्रेशनरऐवजी ड्राय आइस (Dry ice) दिल्याचा आरोप आहे. पाच जणांनी ते सेवन करताच त्यांच्या तोंडाला जळजळ होऊन रक्तस्त्राव सुरू झाला. प्रकृती बिघडल्यावर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदतही केली नाही. सर्वजण आपापल्या परीने दवाखान्यात पोहोचले. एका महिलेला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर चार अतिदक्षता विभागात अर्थातच आयसीयूत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासासाठी ड्राय आइसचा नमुना घेतला आहे.

ग्रेटर नोएडा येथील एका सोसायटीत राहणारा अंकित कुमार एका खासगी कंपनीत काम करतो. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत त्याने सांगितले आहे की, गुरुग्राममध्ये (Gurugram Sector-90) राहणारा त्याचा मित्र माणिक याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो शनिवारी सेक्टर-90 येथील एका रेस्टॉरंटमध्ये गेला होता. अंकित पत्नी आणि एक वर्षाच्या मुलीसोबत होता.

पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप
त्यांच्यासोबत आणखी एक जोडपे येथे आले होते. जेवण झाल्यावर अंकित सोडून सगळ्यांनी माऊथ फ्रेशनर घेतले. मात्र माउथ फ्रेशनर तोंडात घेताच पाचही जणांच्या तोंडात जळजळ होऊन रक्तस्त्राव सुरू झाला आणि उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी घटनास्थळ गाठून रुग्णवाहिकेची वाट पाहण्यास सांगितले. सर्वांची प्रकृती इतकी बिकट होती की ते कसेतरी स्वत: हॉस्पिटलमध्ये पोहोचले. येथून एका व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला, उर्वरित चार जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. एसीपी मानेसर सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

ड्राय आइस म्हणजे काय?
ड्राय आइस हा कार्बन डाय ऑक्साईड वायूचा थंड आणि घनरूप आहे. हे कमी तापमानात अन्नाचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी वापरले जाते. अन्नपदार्थ थंड ठेवण्यासाठीही याचा वापर करता येतो. ड्राय आइसचे तापमान -78 अंश सेल्सिअस असते. ते वापरताना नेहमी हातमोजे घालण्याचा सल्ला दिला जातो. त्याला थेट स्पर्श करू नये.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन