Rajya Sabha Election | नारायण राणे यांच काय होणार? पुन्हा संधी मिळणार की…?

Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेच्या रिक्त होत असलेल्या देशभरातील 56 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. यासाठी उमेदवारांना 15 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील.

निवृत्त होणाऱ्या सदस्यांमधे राज्यातल्या प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar), नारायण राणे (Narayan Rane), व्ही मुरलीधरन (V Muralidharan), वंदना चव्हाण (Vandana Chavan), अनिल देसाई (Anil Desai), कुमार केतकर (Kumar Ketkar), या सहा सदस्यांचा समावेश आहे. या निवडणुकीचे निकालही त्याच दिवशी म्हणजे 27 फेब्रुवारीला जाहीर होणार आहेत.

दरम्यान, राज्यसभेतून निवृत्त होणाऱ्या या खासदारांना पुन्हा राज्यसभेवर जाण्याची संधी मिळणार का? सध्या मोदी सरकारमध्ये सूक्ष्म लघुउद्योग खात्याची धुरा सांभाळणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं काय होणार? त्यांची राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागणार की, पक्षाकडून लोकसभेचं तिकीट त्यांना मिळणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

आगामी निवडणुकीत भाजपामुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न : नाना पटोले

देवाभाऊंची कमाल! एकाच दिवशी 3,16,300 कोटींचे सामंजस्य करार; 83,900 लोकांना मिळणार रोजगार

ईव्हीएम नसेल तर भाजप ग्रामपंचायतही जिंकू शकत नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल