शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन

Namdev Jadhav: मराठा आरक्षणावरुन सध्या मराठा समाज आणि ओबीसी एकमेकांच्या विरोधात उभे टाकल्याचे चित्र महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धोरणानुसार चालण्याची गरज आहे. सर्व जातीपाती एकत्र करुन प्रत्येक जातीतील गुणवंतांना आरक्षण मिळेल असा प्रयत्न करूया, असे आवाहन इतिहासकार नामदेव जाधव (Namdev Jadhav) यांनी केले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

नामदेव जाधव फेसबुक व्हि़डिओमध्ये म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी १२ बलुतेदार आणि १८ पगड जातीचे लोकं एकत्र करुन एक वज्रमूठ तयार केली आणि प्रत्येक जातीतील गुणवंताला पुढे आणले. शिवाजी महाराजांनी सर्व जातींना एकत्र आणलं. प्रत्येक जातीतील गुणवंतांना हेरलं आणि त्यांना जवळ करुन प्रोत्साहन दिलं. यातून त्यांनी कुणालाही शक्य न वाटणारे स्वराज्य उभे केले. मला वाटतं आता महाराष्ट्रात अशा गोष्टीची गरज आहे.

महाराष्ट्रात विनाकारण मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांसमोर उभा ठाकलेले आहेत. याला राजकारणी लोकांचा कुटीलपणा कारणीभूत आहे. आणि म्हणून मला आता असं वाटतं की, महाराष्ट्रातील राजकारणात फेरबदल करणे गरजेचे आहे. आरक्षणाचे निकष बदलणे गरजेचे आहे. आरक्षणाचे निकष बदलताना सर्व जातीतील गुणवतांना पुढे आणण्यासाठी फक्त आणि फक्त आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे. जात हा निकष काढून टाकला पाहिजे. तसेच प्रस्थापिताना बाजूला करुन गुणवतांना जवळ केले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal