पतीने शेजाऱ्याशी फोनवरुन बोलण्यापासून रोखलं, रागात पत्नीने उकळतं तेल पतीच्या प्रायव्हेट पार्टवर टाकलं

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये पत्नीला शेजाऱ्याशी फोनवर बोलण्यापासून रोखणे पतीला महागात पडले आहे. पत्नीने पतीचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा संतापलेल्या पतीने तिच्याकडून मोबाईल हिसकावून घेतला. त्यामुळे पत्नीला राग आला आणि रात्री पती झोपलेला असताना पत्नीने त्याच्या प्रायव्हेट पार्टवर उकळते तेल ओतले. त्यानंतर लोकांना या घटनेची माहिती मिळण्याआधी पत्नी फरार झाली. कंपू पोलीस स्टेशन हद्दीतील माधवी नगर येथील ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी फरार आरोपी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कंपू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माधवी नगर येथे राहणारा सुनील धाकड (३२) हा खासगी नोकरी करतो. त्याची पत्नी भावना त्याच्यासोबत राहते. काही दिवसांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेने सुनीलजवळ त्याच्या पत्नीची तक्रार केली होती की, तो गेल्यानंतर त्याची पत्नी भावना त्या महिलेच्या पतीशी बोलते. याबाबत त्या महिलेने अनेकदा भावनाला समजावून सांगितले तरीही ती तिचे म्हणणे ऐकत नव्हती. एके दिवशी पती सुनील घरी आला असता भावना शेजारी तरुणाशी मोबाईलवर बोलत होती. त्याने अनेकवेळा पत्नीशी बोलण्यास नकार दिला. मात्र तिने मोबाईलवर बोलणे थांबवले नाही. यामुळे संतापलेल्या सुनीलने भावनाचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी भावना रागावून निघून गेली.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पती घाईघाईने झोपला होता. मग भावनाने उठून किचनमध्ये पातेल्यात तेल उकळले आणि थेट पतीच्या प्रायव्हेट पार्टवर गरम तेल ओतले. तेल इतके गरम होते की पतीचा प्रायव्हेट पार्ट जळाला. यादरम्यान भावना पळून गेली. वेदनेने त्रस्त झालेल्या सुनीलने मदतीसाठी आरडाओरडा केला, त्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळ गाठून जखमी सुनीलला उपचारासाठी दाखल केले व पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्याचवेळी पतीच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून तिचा शोध सुरू केला आहे.