अजित पवारांनी Praful Patel यांना उमेदवारी देवून केली पावरफुल खेळी; विरोधी गटाला केले चेकमेट

Rajya Sabha Elections:  अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांना राज्यसभेचे उमेदवार करण्यात आले आहे. गेल्या वर्षी शरद पवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या नेत्यांमध्ये प्रफुल्ल पटेल यांचा समावेश होतो. प्रफुल्ल पटेल हे केंद्रातील यूपीए सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. ते अजित पवार यांच्या जवळचे मानले जातात. महाराष्ट्रात राज्यसभेच्या सहा जागा रिक्त आहेत. भाजपने तीन, शिवसेनेने एक आणि राष्ट्रवादीनेही एक उमेदवार जाहीर केला आहे. १५ फेब्रुवारी हा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून त्याच्या एक दिवस आधी अजित पवार यांच्या पक्षाने उमेदवाराच्या नावाची घोषणा केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार गटाकडून राज्यसभा सभापतींकडे प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या अपात्रतेसाठी याचिका दाखल केली आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार अद्याप कायम आहे. या पार्श्वभूमीवर ते अपात्र ठरल्यास पुढे अधिक गुंता वाढू नये, म्हणून पक्षानं त्यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल यांच्या उमेदवारीमुळे नव्याने जागा निर्माण होणार आहे. राज्यसभेवर प्रफुल्ल पटेल निवडून आल्यानंतर त्यांना आधीच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे राज्यसभेत राष्ट्रवादीच्या कोट्यातील आणखी एक जागा रिक्त होईल. या जागेसाठी जेव्हा पोटनिवडणूक लावली जाईल, तेव्हा इतर नावांचा विचार केला जाईल, अशी माहिती सुनील तटकरेंनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole