Halal certificate : ‘हलाल प्रमाणपत्र’ घेण्यास विरोध वाढला; गिरीश खत्री यांनी केली ‘ही’ मोठी मागणी

पुणे – गेल्‍या काही काळापासून भारतात हेतूतः ‘हलाल उत्‍पादनांची मागणी केली जात असून हिंदु व्‍यापार्‍यांना व्‍यवसाय करण्‍यासाठी ‘हलाल प्रमाणपत्र’ घ्‍यावे लागत आहे. पूर्वी ‘हलाल’ ही संकल्‍पना केवळ मांसाहारी पदार्थांपुरती आणि मुस्‍लिम देशांच्‍या निर्यातीसाठी मर्यादित होती. आता मात्र भारतातील साखर, तेल, आटा, चॉकलेट, मिठाई, सौंदर्यप्रसाधने, औषधे (Sugar, oil, flour, chocolate, sweets, cosmetics, medicines) आदी विविध उत्‍पादनेही ‘हलाल सर्टिफाइड’ (Halal certificate) होऊ लागली आहेत.

मुळात भारत सरकारच्‍या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्‍था उत्‍पादनांचे प्रमाणिकरण करत असतांना वेगळ्‍या ‘हलाल प्रमाणिकरणा’ची गरजच काय ? आज मॅकडोनल्‍ड्‌स, केएफ्‌सी, बर्गरकिंग, पिझ्‍झा हट यांसारख्‍या नामवंत कंपन्‍या हिंदू, जैन, शीख अशा गैर-मुस्‍लिम समाजाला सर्रास ‘हलाल’ खाद्यपदार्थ विकत आहेत.

या मुद्द्यावरून हिंदू जनजागरण समिती यासह काही व्यापारी संघटना देखील आक्रमक झाल्या आहेत. यात कोफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेकर्स पुणे डिव्हिजनचे पुणे शहर अध्यक्ष गिरीश खत्री (Girish Khatri, Pune City President of Confederation of All India Trekkers Pune Division) यांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली असून त्यांनी या सर्टिफिकेशन पद्धतीला कडाडून विरोध केला आहे.(Halal certificate: Opposition to take ‘Halal certificate’ increased; Girish Khatri made ‘this’ big demand)

ते म्हणाले, छोट्या व्यापारी असोत किंवा मोठे व्यापारी असोत या मंडळींनी किती सर्टिफिकेट काढायची असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. उद्या कुणीही उठेल आणि म्हणेल की आमच्याकडील लायसन घ्या… हे कम्पल्सरी आहे…. तुम्हाला याचा फायदा होणार आहे.मात्र हे जर सरकारशी संबंधित असेल तर आम्ही हे लायसन नक्की काढू, आम्हाला ते बंधनकारक आहे. मात्र हलाल सारखे लायसन्स आम्ही घेत बसलो तर याचा व्यापारी बंधूंना त्रास होणार आहे. डॉक्युमेंट पासून ते आर्थिक बाबींचा त्यांच्यावर लोड येणार आहे. आमची व्यापारी बंधूंची ही मागणी आहे की या गोष्टी सक्तीच्या नसाव्यात आणि असल्या तर त्या सरकारच्या माध्यमातून असाव्यात. सरकारचा यावर कंट्रोल असावा असे आम्हाला वाटते.असं त्यांनी म्हटले आहे.