धायरीतील अतिक्रमणांवर हातोडा; पोलिस बंदोबस्तात झाली कारवाई

धायरी- धायरीतील लगड मळा ते दळवीनगर नांदेड सिटी गेटपर्यंतच्या अनधिकृत बांधकामावर पालिकेने कारवाई केली. पावसाळा सुरू असल्याने शेड आणि दुकानांमधील साहित्य हलविणे अवघड असल्याने व्यापाऱ्यांनी कारवाई न करण्याचे आवाहन केले होते. परंतु, अधिकाऱ्यांनी तरीही कारवाई केल्याने दुकानदार व नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

मनपा बांधकाम विभागाचे बांधकाम अधीक्षक युवराज देशमुख यांच्या नियंत्रणाखाली कार्यकारी अभियंता हेमंत मोरे, उपअभियंता विजय कुमावत, कनिष्ठ अभियंता महेश झोमन, विशाल परदेशी, रितेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. यावेळी पोलिस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली.