एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळंचं त्यांना पक्षानं हाकलून दिलं – महाजन

Girish Mahajan vs Eknath khadase : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खडसे विरुद्ध महाजन असा वाद सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांचा राजीनामा हा दाऊदचा आरोप झाला म्हणून घेतला नव्हता. तर पक्षात राहून त्यांनी चोऱ्या आणि आर्थिक घोटाळे केले होते, त्यामुळं त्यांना पक्षाने हाकलून दिल्याचे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केलं.

दाऊदच्या संभाषणामुळं आपल्याला पक्षातून काढलं असं एकनाथ खडसेंनी समजण्याची गरज नसल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसे ज्या फोटोवरुन आरोप करत आहेत ते दहा वर्षांपूर्वीचे कुंभमेळा प्रसंगी मुस्लिम धर्मगुरुंच्या घरी असलेल्या विवाह सोहळ्यातील फोटो असल्याचे महाजन म्हणाले. सध्या एकनाथ खडसे हे आता मानसिक तणावात असल्याचे महाजन म्हणाले.

भोसरी भूखंड प्रकरण, गौण खनिज उत्खनन प्रकरणात आलेल्या नोटीसमुळं एकनाथ खडसेंची परिस्थिती केविलवाणी झाली आहे. काय बोलावं हे आता एकनाथ खडसेंना कळत नाही. त्यामुळं वाटेल ते बेछूट आरोप ते करत आहेत. एकनाथ खडसे यांच्या आरोपाला आम्ही किंमत देत नसल्याचे महाजन म्हणाले.
वैफल्यग्रस्त परिस्थिती झाल्यामुळे काहीतरी बोलायचं म्हणून अशा प्रकारे आरोप केले जात असल्याचे महाजन म्हणाले. एकनाथ खडसेंची परिस्थिती वैफल्यग्रस्त झाल्याने सकाळपासून संध्याकाळपर्यंत खडसे बडबड करत असतात असे महाजन म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!