Hardik Pandya | हार्दिक पांड्याचं सर्वात मोठं रहस्य…; माजी खेळाडूने सत्य लपवत असल्याचा केला दावा

Hardik Pandya | हार्दिक पांड्याचा दुखापतींशी दीर्घकाळ संबंध आहे. आयपीएल 2024 पूर्वीच हार्दिकला दुखापत झाली होती. 2023 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान त्याला दुखापत झाली होती, ज्यामुळे तो काही महिने क्रिकेटपासून दूर राहिला होता. आता आयपीएलमध्ये मुंबईचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याबद्दल मोठा दावा करण्यात आला असून, तो दुखापतग्रस्त आहे, पण तो मान्य करत नसल्याचे यात म्हटले आहे.

न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज सायमन डोल याने हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) दुखापत झाल्याचे मत व्यक्त केले आहे. मोसमातील पहिल्या दोन सामन्यांमध्ये हार्दिकने गोलंदाजी केली. पण पुढच्या दोन सामन्यात त्याने गोलंदाजी केली नाही आणि त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्धच्या पाचव्या सामन्यात हार्दिकने फक्त एकच षटक टाकले. हार्दिकने स्वत:ला गोलंदाजीपासून दूर ठेवल्याने मुंबईचा कर्णधार दुखापतग्रस्त असल्याची शंका सायमन डौलच्या मनात निर्माण होत आहे.

क्रिकबझवर बोलताना सायमन डौल म्हणाला, “तुम्ही पहिल्या सामन्यात पहिले षटक टाकून एक उदाहरण ठेवले आणि नंतर अचानक तुमची गरज भासली नाही. तो जखमी आहे. मी तुम्हाला सांगत आहे की त्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे. तो सहमत नाही. पण त्याच्यात काहीतरी चूक आहे. ही माझ्या मनातील भावना आहे. ” दिल्लीविरुद्ध गोलंदाजी न करण्याबाबत हार्दिकला विचारण्यात आले. हार्दिकने उत्तर दिले की तो ‘योग्य वेळी’ गोलंदाजी करेल.

हार्दिकची दुखापत टीम इंडियासाठी पुन्हा समस्या निर्माण करू शकते
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे मुंबई आणि टीम इंडियासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. आयपीएलनंतर टी-20 विश्वचषक जूनपासून खेळवला जाणार आहे. हार्दिकला खरोखर दुखापत झाली असेल, तर ती चिंतेची बाब आहे. मात्र त्याच्या संभाव्य दुखापतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उल्लेखनीय आहे की, हार्दिक याआधी 2023च्या एकदिवसीय विश्वचषकात जखमी झाला होता. स्पर्धेतील पहिले काही सामने खेळल्यानंतर हार्दिकला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरण्यासाठी हार्दिकला काही महिने लागले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Loksabha Election 2024 | राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक

Eknath Shinde | स्वार्थासाठी राजकीय आखाडे बदलणारे पहिलवान मोहोळांसमोर टिकणार नाहीत

Amit Shah | औरंगाबाद,उस्मानाबादच्या नामांतरास शरद पवार विरोध करत होते