Shradha Kapoor Boyfriend: जामनगरमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनकडे (Anant Ambani-Radhika Merchant Pre-Wedding) सगळ्यांचे लक्ष लागले आहे. प्री-वेडिंगमध्ये रिहाना व्यतिरिक्त एका व्यक्तीची सर्वाधिक चर्चा झाली. होय, आम्ही श्रद्धा कपूरबद्दल बोलत आहोत, पण सर्वांच्या नजरा अभिनेत्रीकडे नसून तिच्या कथित बॉयफ्रेंड (Shradha Kapoor Rumored Boyfriend) राहुल मोदीवर (Rahul Modi) आहेत. राहुल मोदीही श्रद्धासोबत जामनगरला पोहोचला आणि तो सर्व वेळ अभिनेत्रीसोबत दिसला. यानंतर राहुल आणि श्रद्धामध्ये काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
टिन्सेल टाउन डिवा श्रद्धा कपूरने (Shradha Kapoor) सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि ती सर्वत्र चर्चेत आली आहे. श्रद्धा कपूरने आपलं नातं अधिकृत केलंय का?, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. जामनगरमध्ये अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग पार्टीत सहभागी होण्यासाठी ती मुंबई विमानतळावर पोहोचताच ती चर्चेत आली. विमानतळावरील तिचा व्हिडिओ आणि फोटो काही वेळातच इंटरनेटवर व्हायरल झाले.
कोण आहे श्रद्धा कपूरचा बॉयफ्रेंड राहुल मोदी?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की राहुल मोदी कोण आहे? श्रद्धा कपूरचा कथित बॉयफ्रेंड एक लेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक आहे. ही कुजबुज तेव्हा सुरू झाली जेव्हा श्रद्धाने ‘तू झुठी मैं मक्कर’ या हिट चित्रपटात काम केले. विशेष म्हणजे राहुल मोदी याने लव रंजनसोबत ‘तू झुठी मैं मकर’ हा चित्रपट लिहिला आहे.
राहुल टीव्ही मालिकांमध्येही दिसला आहे
राहुलने एमटीव्ही शो ‘पर्सनल अत्याचार – सीझन 1’ मध्ये स्पर्धक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली आणि नंतर ‘अगले जनम मोहे बिटिया ही किजो’ आणि ‘लाइफ विदाऊट वाईफ’ सारख्या शोचा भाग बनला. टीव्हीशिवाय राहुल मोदी ‘प्यार का पंचनामा 2’ आणि ‘सोनू के टीटू की स्वीटी’ सारख्या चित्रपटांचाही भाग आहे. अलीकडील रिपोर्ट्सनुसार, ‘तू झुठी मैं मक्कर’च्या शूटिंगदरम्यान श्रद्धा आणि राहुल यांच्यात प्रेम फुलायला सुरू झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: Nana Patole
स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य
अंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी? प्री-वेडिंग अटेंड करायला PSL सोडून आला दिग्गज खेळाडू