Rohit Sharma Death: धाकड फलंदाज रोहित शर्माचे निधन, क्रिकेटविश्वाला जबर धक्का

Rohit Sharma Death: राजस्थान रणजी संघाचा माजी खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते, त्यानंतर या खेळाडूने जीवन-मरणाची लढाई हरली आणि शनिवारी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने राज्यातील क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे.

विशेष म्हणजे राजस्थानच्या आक्रमक फलंदाजांमध्ये रोहित शर्मा यांच्या नावाचा समावेश होतो. आत्तापर्यंत ते राजस्थान रणजी संघाकडून 7 रणजी सामने खेळले आहेत. याशिवाय त्यांनी 28 एकदिवसीय रणजी सामने आणि चार टी-20 सामने खेळले आहेत. ते जयपूरमध्ये आरएस अकादमी नावाची क्रिकेट अकादमीही चालवत होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

रोहित अष्टपैलू खेळाडू होते
धाकड फलंदाज रोहितने राजस्थान विरुद्ध सर्व्हिसेस सामन्यात पदार्पण केले होते. त्यांनी 2004 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटचा प्रवास सुरू केला आणि तो 2009 मध्ये संपला, तरीही ते अ श्रेणीचे सामने खेळत असे. रोहित शर्मा यांनी रणजी ट्रॉफी, प्रथम श्रेणी आणि इतर फॉरमॅटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व केले.राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सचिव भवानी शंकर समोटा यांनी सांगितले की, रोहित हे अष्टपैलू खेळाडू होते. रोहित त्यांच्या झटपट फलंदाजीसाठी ओळखले जात होते. त्यांनी लेग स्पिन बॉल्सनेही महत्त्वाचे योगदान दिले.

महत्वाच्या बातम्या : 

‘समृद्धी’ला शिंदे-फडणवीसांच्या भ्रष्टाचाराचे भगदाड: Nana Patole

स्पेनमधून भारतात फिरायला आलेल्या विदेशी महिलेच्या तंबूत घुसून ८-१० जणांनी केलं नकोसं कृत्य

अंबानींचं लग्न पाकिस्तान लीग पेक्षा भारी? प्री-वेडिंग अटेंड करायला PSL सोडून आला दिग्गज खेळाडू