फ्लिपकार्ट समूहाने एक वर्षात सुमारे ३००० टन कचरा भरावक्षेत्रात टाकणे टाळले, शाश्वततेप्रती बांधिलकीच्या दिशेने आणखी पुढे झेप

हरयाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक व महाराष्ट्रातील आस्थापनांमध्ये शून्य कचरा निर्मितीच्या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांसाठी टोटल रिसोर्स यूज अँड एफिशिएन्सी (ट्रू) गोल्ड सर्टिफिकेशन प्राप्त पर्यावरणावरील परिणाम कमीतकमी राखण्यासाठी समर्पितपणे लक्ष केंद्रित करण्याच्या माध्यमातून, आपल्या सर्व कामकाजांद्वारे शून्य कचरा भरावक्षेत्रांमध्ये टाकण्याचे उद्दिष्ट फ्लिपकार्टने ठेवले आहे; ह्यात कचरा व्यवस्थापनाच्या जबाबदार पद्धतींवर भर दिला जात आहे

Flipkart Group: भारतातील कचरा भरावक्षेत्रे वाढत असल्याची चिंताजनक समस्या सोडवण्याच्या दिशेने फ्लिपकार्ट समूहाने आणखी मोठी झेप घेतली आहे. समूहाने एक वर्षात सुमारे ३००० टन घातक नसलेला घनकचरा भरावक्षेत्रे सोडून अन्यत्र वळवण्यात यश मिळवले आहे.

समूहाच्या चार आस्थापनांनी शून्य कचरा प्रयत्नांसाठी टोटल रिसोर्स यूज अँड एफिशिएन्सी (ट्रु) गोल्ड सर्टिफिकेशन प्राप्त केले आहे. ट्रु-प्रमाणित प्रकल्पांना संसाधन व्यवस्थापनाची काटेकोर उद्दिष्टे पूर्ण करणे बंधनकारक असते. आस्थापनेतील किमान ९० टक्के कचऱ्याची विल्हेवाट भरावक्षेत्रात टाकणे, जाळणे किंवा पर्यावरणात सोडून देणे आदी मार्गांनी न करता अन्य पद्धतींनी करणे आवश्यक असते.

फ्लिपकार्टची ट्रु-प्रमाणित आस्थापने फारुखनगर (हरयाणा), उलुबेरिया (पश्चिम बंगाल), मालुर (कर्नाटक) आणि रेनेसान्स (महाराष्ट्र) येथे आहेत आणि ह्या सर्व आस्थापनांचे एकूण क्षेत्र १८ लाख चौरस फूट आहे. फ्लिपकार्टने चक्राकार अर्थव्यवस्थेला बढावा देण्याप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे आणि समूहाने शून्य कचरा धोरणाचा अवलंबही केला आहे. ह्यामध्ये जबाबदार वापर, पुनर्वापर तसेच उत्पादने, पॅकेजिंग व साहित्य परत मिळवण्याचा समावेश आहे. त्याचप्रमाणे कचरा जाळणे किंवा तो भरावक्षेत्रात टाकणे टाळण्याचाही समावेश आहे. ह्या प्रयत्नात कंपनीने प्रमाणनाच्या कचरा अन्यत्र वळवण्याच्या दरासंदर्भातील (डायव्हर्जन रेट) आवश्यकता केवळ पूर्ण केल्या नाही आहेत, तर त्याहून अधिक चांगली कामगिरी केली आहे. सर्व चार आस्थापनांवर ९७ टक्क्यांहून अधिक कचरा अन्यत्र वळवण्यात समूहाला यश आले आहे.

ह्या प्रमाणपत्रामुळे फ्लिपकार्टला पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक कंपन्यांमध्ये आघाडीचे स्थान प्राप्त झाले आहे. कंपनीच्या शून्य कचरा उपक्रमांचे यश सर्वांना दिसले आहे तसेच एक धोरणी व आर्थिकदृष्ट्या जबाबदार कंपनी म्हणून कंपनीची ओळख प्रस्थापित झाली आहे. आपल्या आवारात निर्माण झालेल्या सर्व कागद व प्लास्टिकच्या कचऱ्यासाठी चक्राकार अर्थव्यवस्था शक्य करण्यात फ्लिपकार्ट सातत्याने महत्त्वाची भूमिका बजावत आहे. ह्यासाठी फ्लिपकार्टने आपल्या गोदामांमध्ये कर्मचाऱ्यांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने ‘क्लीन कॅम्पस मुव्हमेंट’ सुरू केली आहे. फ्लिपकार्ट पॅकेजिंगचा वापर आणि कचरा विल्हेवाट समीकरणाचा तोल साधण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कचऱ्याचा वापर नवीन उत्पादनाचा कच्चा माल म्हणून करून शाश्वत चक्र निर्माण करणार आहे. ह्या उपक्रमामुळे नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करण्यात आणि त्यायोगे हरितगृह वायूंचे उत्सर्जनही कमी करण्यात मदत होणार आहे तसेच निर्माण झालेला कचरा भरावक्षेत्राकडे जाणार नाही ह्याचीही निश्चिती होणार आहे. चक्राकार अर्थव्यवस्थेचे धोरण १३ स्थळांवर राबवण्यात आले आहे. त्यामुळे फ्लिपकार्टच्या एकूण कागदी कचऱ्यापैकी सुमारे ५० टक्के कचऱ्याचे रूपांतरण शक्य होत आहे.

फ्लिपकार्ट समूहाचे वरिष्ठ उपाध्यक्ष तसेच सप्लाय चेन, कस्टमर एक्स्पिरिअन्स व रिकॉमर्स विभागांचे प्रमुख हेमंत बद्री शून्य कचरा धोरण व त्यानंतरचे ट्रु गोल्ड सर्टिफिकेशन ह्यांबद्दल म्हणाले, “शाश्वतता उद्दिष्टतांच्या दिशेने आम्ही केलेली प्रगती ही कायापालट घडवून आणणारी ठरत आहे. अविश्रांत नवोन्मेष व जबाबदारीची सामाईक जाणीव ह्यांमुळे ही प्रगती झाली आहे. ग्रीन बिझनेस सर्टिफिकेशन इंकद्वारे शून्य कचरा निर्मितीसाठी प्रदान करण्यात आलेली चार ट्रू गोल्ड प्रमाणपत्रे ही ह्या प्रवासातील आणखी एक महत्त्वपूर्ण पायरी आहे. कारण, आम्ही शाश्वत ई-कॉमर्ससाठी सातत्याने निश्चित मापदंड स्थापन करत आहोत आणि त्यामुळे उद्योगक्षेत्राचा चेहरामोहरा पालटत आहे. ई-कॉमर्स एकाच वेळी पर्यावरणपूरकही ठरू शकते आणि जास्तीतजास्त मूल्यनिर्मितीही करू शकते हे फ्लिपकार्टने, संसाधन कार्यक्षमता व किमान कचरा निर्मिती ही धोरणे अवलंबून, दाखवून दिले आहे. पर्यावरणसजग व्यापारामध्ये पायाभूत काम करण्याप्रती आम्ही सातत्याने देत असलेल्या ग्वाहीवर ह्या प्रमाणनामुळे शिक्कामोर्तब झाले आहे. ह्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर आणि आजूबाजूच्या जगावर होत आहे.”

फ्लिपकार्ट समूहाचे प्रमुख कॉर्पोरेट व्यवहार अधिकारी रजनीश कुमार ह्या महत्त्वाच्या टप्प्याबद्दल म्हणाले, “सध्याच्या हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी जगातील प्रत्येक कंपनीने जागरूकतेने काम करणे आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने ठोस कृती केली तरच हे शक्य होईल. सर्वांसाठी शाश्वत भवितव्य उभे करणे आणि हवामानविषयक उद्दिष्टांप्रती भारताच्या बांधिलकीमध्ये योगदान देणे ही आपली जबाबदारी आहे असे फ्लिपकार्ट समूहाला खरोखर वाटते. आम्ही ह्या कामावर किती भर देत आहोत हे आमच्या शून्य कचरा उपक्रमासाठी मिळालेल्या ट्रू गोल्ड प्रमाणपत्रांतून सिद्ध होते.”

यूएस ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (यूएसजीबीएस) आणि जीबीसीआयचे अध्यक्ष पीटर टेम्पलटन ह्यांनी नमूद केले, “व्यवसायांनी आपल्या सध्याच्या कचरा निर्मिती करणाऱ्या पद्धतींच्या पलीकडील विचार केला पाहिजे आणि सर्वप्रथम कचऱ्याची निर्मितीच कमी प्रमाणात होईल अशा पद्धतीने प्रक्रियांची रचना करण्याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. शून्य कचरा व्यवसाय पद्धती अंमलात आणण्यासाठी पुनर्विचार, पुनर्प्रशिक्षण, नवीन साधने आणि सध्याची कचरा व्यवस्थापन पद्धत बदलण्याकरता भक्कम नेतृत्व ह्यांची आवश्यकता आहे. फ्लिपकार्टने ह्या प्रयत्नाचे नेतृत्व केल्यामुळे ते त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी, समुदायासाठी तसेच एकंदर ग्राहकांसाठी मोठी प्रगती साध्य करत आहेत.”

फ्लिपकार्टचा शाश्वततेप्रती सक्रिय दृष्टिकोन पर्यावरणविषयक मुद्दयांशी सुसंगत आहे आणि जबाबदार पद्धतींप्रती बांधील व चांगले हेतू साध्य करणाऱ्या ब्रॅण्ड्कडे वाढत्या संख्येने आकर्षित होत असलेल्या ग्राहकांशीही तो सुसंगत आहे. आपल्या व्यापक शाश्वतता दृष्टीशी संलग्नता राखत फ्लिपकार्टने २०२१ सालापासूनच आपल्या सर्व गोदामांमध्ये १०० टक्के कागदावर आधारित पॅकेजिंगकडे स्थित्यंतर केले आहे. त्यामुळे व्यापक शाश्वतता उपक्रमांचा एक भाग म्हणून कंपनीने प्लास्टिकचा वापर लक्षणीयरित्या कमी केला आहे. ह्यामध्ये लॉजिस्टिक्स वाहनताफ्यात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करणे, ऊर्जा कार्यक्षम पद्धतींचा अवलंब तसेच नूतनीकरणीय ऊर्जेच्या वापरातील वाढ ह्यांचाही समावेश होतो. ग्रीन बिल्डिंग, शाश्वत पॅकेजिंग आदी पद्धतींचा अवलंबही फ्लिपकार्ट करत आहे. शाश्वत कामकाजाचे उद्दिष्ट साध्य करण्याप्रती कंपनी करत असलेले प्रयत्न ह्यांतून दिसून येत आहेत.

शून्य कचरा कार्यक्रम हा कार्बनमुक्तीकडे जाणाऱ्या तसेच पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या मार्गावरील अत्यावश्यक धोरणांपैकी एक आहे. ह्यामुळे खर्च कमी होतो तसेच ह्याचे अनेक सामाजिक लाभही आहेत. हे धोरण नवीन मापदंड स्थापन करणे, कर्मचाऱ्यांना शिक्षण देणे आणि कंपन्यांना शून्य कचरा निर्मितीच्या जवळ घेऊन जाणारे नवोन्मेषकारी उपाय पुरवणे ह्यांसाठी समर्पित आहे. फ्लिपकार्टने हाती घेतलेले काही महत्त्वपूर्ण उपक्रम पुढे दिले आहेत. ट्रु गोल्ड सर्टिफिकेशन मिळवून देण्यात ह्या उपक्रमांचा वाटा मोठा आहे.

स्थानिक चिन्हे, कार्यस्थळावर कचरा साठवण्याची सोय, कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी विशेष कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच शिफारसकृत टेम्प्लेट्सचा वापर करून इन-हाउस डेटा नोंदणी ह्यांसारख्या शाश्वत कचका व्यवस्थापन पद्धतींची अंमलबजावणी. सिंगल-बिन प्रणाली रद्द करून कचरा गोळा करण्याची कार्यक्षमता वाढवणे, व्हेंडरचे नियमित निरीक्षण करण्यासाठी कष्ट घेणे आणि व्हेंडर्सकडून प्राप्त झालेली माहिती प्रस्थापित टेम्प्लेट्सशी जुळणारी आहे की नाही हे कसून तपासणे. जैवविघटनशील, जैवअविघटनशिल आणि उर्वरित घनकचरा अशा प्रवर्गांमध्ये कचऱ्याचे काळजीपूर्वक वर्गीकरण करून कचरा व्यवस्थापनात सुसूत्रता आणणे.

अधिक कन्वर्जन दर साध्य करण्याच्या दृष्टीने, रिसायकलिंग बाजारपेठेत मूल्य नसलेल्या निम्नमूल्य कचऱ्यासंदर्भातील आकडेवारी गोळा करण्यास प्राधान्य देणे. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आणि व्हेण्डर्समध्ये शून्य कचरा निर्मितीची जाणीव जोपासणे, जेणेकरून शाश्वततेप्रती सर्वांगीण दृष्टिकोन तयार होऊ शकेल.

शून्य कचऱ्याबाबतची ट्रू रेटिंग प्रणाली ही एक काटेकोर चौकट आहे. त्यामुळे कंपन्यांना कार्बन उत्सर्जन कमी करतानाच शून्य कचरा उद्दिष्टे निश्चित करणे, त्यांचा पाठपुरावा करणे आणि ती साध्य करणे ह्यांत मदत होते.

महत्वाच्या बातम्या-