हेमंत रासने यांच्या दत्तवाडीतील पदयात्रेला मोठा प्रतिसाद 

पुणे : भाजप, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट), शिवसंग्राम, राष्ट्रीय समाज पक्ष, रयत क्रांती संघटना आणि पतित पावन संघटना, महायुतीचे कसबा विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हेमंत रासने यांनी दत्तवाडी परिसरामध्ये पदयात्रेद्वारे मतदारांशी संपर्क साधला.यावेळी हेमंत रासने ( Hemant Raasne ) यांच्या दत्तवाडीतील पदयात्रेला मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.

दांडेकर पुलाजवळील मांगीरबाबा मंदिरापासून पदयात्रेचा प्रारंभ झाला. आमदार भिमराव तापकीर, माजी नगरसेवक धीरज घाटे, स्मिता वस्ते, धनंजय जाधव, रमेश काळे, मंजुषा नागपुरे, आनंद रिठे, दीपक पोटे यांच्यासह राजेंद्र काकडे, अश्विनी कदम, अश्विनी पवार, अमित कंक, राजू कदम, अर्जुन खानापुरे, अक्षय ढमाले, आकाश खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. गांजवे चौक परिसरात पदयात्रेचा समारोप झाला.

पर्वतीच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून पर्वती जल  केंद्रात उभारण्यात आलेल्या पाचशे दशलक्ष लिटर प्रतिदीन (एमएलडी) क्षमतेच्या जलशुद्धिकरण केंद्रामुळे सिंहगड रस्ता, दांडेकर पूल आणि मध्यवर्ती पेठांच्या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत झाली आहे. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला, असे रासने यांनी समारोप सभेत सांगितले.