माझ्याविरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला, मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे – चित्रा वाघ
पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते आणि किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik Rape case) यांच्यावरील बलात्कार आरोप प्रकरणाने नाट्यमय वळण घेतले आहे. या प्रकरणातील पिडीत तरुणीने मोठा गौप्यस्फोट करत मदतीसाठी उभा राहिलेल्या भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
पीडितेनं आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं, असाही खळबळजनक आरोप तिनं केला आहे. महम्मद अहमद अंकल (चाचा) आणि चित्रा वाघ यांनी हे सर्व प्रकरण घडवून आणले असल्याचा खुलासा पीडित तरुणीने केला आहे. याशिवाय विशिष्ट यंत्रणेद्वारे माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज येत आहेत, असाही दावा या पिडीत तरुणीने केला आहे.
त्याचसोबत काल भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने आपल्याला एक पत्र आणून दिले असून ते पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येतं असल्याचेही तरुणीने म्हटले आहे. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचे भासवण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोपही या पीडित तरुणीने केला आहे.
दरम्यान, रघुनाथ कुचिक प्रकरण पीडितेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले. खरंतर वाईट वाटलंय पण हरकत नाही असे ही अनुभव येतात. फेब्रुवारीपासून एकटी लढणाऱ्या पीडितेसोबत उभे राहिले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्याविरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला. मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.
रघुनाथ कुचिक प्रकरण पिडीतेने माझ्यावर केलेले आरोप आताचं ऐकले….खरं तर वाईट वाटलयं पण हरकत नाही असे ही अनुभव येतात
Feb पासून एकटी लढणार्या पिडीतेसोबत उभे राहीले तेव्हा कुणी तिच्या मदतीला नव्हतं आज मात्र माझ्या विरोधात सगळे एकत्र याचा आनंद वाटला..
मी सगळ्या चौकशींसाठी तयार आहे pic.twitter.com/wtHn1s3bz9— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 12, 2022