दिल्लीकडून येणारे बहुतांश प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह – नितीन राऊत

नागपूर – नागपुरमधील कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेतल्यावर दिल्लीकडून येणारे बहुतांश प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह (Corona positive) असल्याचे लक्षात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरच(Dr. Babasaheb Ambedkar International Airport)  टेस्टिंग करुन उपाय योजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिली.

यासंदर्भातील आपण जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्याशीही बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, नागपूरात दिल्लीकडून येणाऱ्या प्रवाशांमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे. यावर उपाय म्हणून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग (Contact tracing) वाढविण्यावर आमचा भर आहे. शहरातील नागरिकांनीही खबरदारी घ्यावी, सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा आणि गर्दीमध्ये जाणे टाळावे. नागरिकांच्या आरोग्यसाठी सर्वतोपरी प्रय़त्न करणार आहे.