Loksabha Election : राष्ट्रवादीची तिरकी चाल; ‘इतक्या’ जागा लढण्याचा धरला आग्रह

Loksabha Election – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक हे जोमाने तयारीला लागले असून जागावाटपाचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. महायुतीने एका बाजूला राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला असताना दुसऱ्या बाजूला मविआ देखील व्यूहरचना करत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत आगामी लोकसभा निवडणुकांमधील जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, शरद पवार गट आणि ठाकरे गटाची बैठक संपन्न झाली. ठाकरेंचं मुंबईतील (Mumbai) निवासस्थान मातोश्रीवर (Matoshree) बैठक पार पडल्याची माहिती मिळत आहे. तब्बल दोन तास चाललेल्या बैठकीत जागावाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 10 ते 11 जागा लढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच, अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा असल्याचीही माहिती आहे. अशातच महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या मुद्द्यावर जानेवारीत काँग्रेससोबत उद्धव ठाकरे, शरद पवार गटाच्या वरिष्ठांची बैठक दिल्लीत पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासोबतच अमरावती आणि भंडाऱ्याच्या जागेसाठी काँग्रेस आणि शरद पवार गटामध्ये चर्चा होणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’