आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना

Mumbai  :  औरंगाबादमधील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका (MLA Sanjay Shirsat Heart Attack)आला आहे. त्यांना उपचारासाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सने मुंबईकडे रवाना करण्यात आले आहे. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळी त्यांना उपचारासाठी मुंबईकडे रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांना सोमवारी रात्री अचानक छाती दुखू लागले. त्यांना तातडीने शहरातील सिग्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सिरसाट यांना सिरसाट यांना हृदय विकाराचा सौम्य झटका आला होता. तसंच उच्च रक्तदाबाचा त्रासही जाणवला. संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर लगेच मुख्यमंत्र्यांनी सूत्र फिरवली.

संजय शिरसाट यांना मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादला तातडीने एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या सल्ल्यानेच शिरसाट यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल केले आहे.