आता देवेंद्र फडणवीस नाही तर डॉ. देवेंद्र फडणवीस म्हणायचं

Dr. Devendra Fadnavis: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काल जपानमधल्या कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण आणि सामाजिक समानतेसाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून फडणवीस यांना डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचं सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यामुळे ही मानद डॉक्टरेट पदवी मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो, अशा भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.

महत्वाच्या बातम्या-

विरोधकांना जनता ४४० व्होल्टचा करंट लावणार; चंद्रशेखर बावनकुळे यांचा विश्वास

रामदास आठवले यांनी तळागाळातील वंचित घटकांसाठी केलेले कार्य प्रेरक आहे – देवधर

मला या स्थितीत आणण्यासाठी खूप धन्यवाद..; कुस्तीपटू विनेश फोगटने पद्मश्री आणि अर्जुन पुरस्कार केले परत