Navneet Rana | नवनीत राणांविरोधात दिनेश बुब यांना बच्चू कडू उमेदवारी देणार?

भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज अखेर अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे.

दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे. आम्ही अमरावती या जागेसाठी आमचा उमेदवार देणार आहोत. आम्ही राणा यांचा प्रचार करणार नाही, असे कडू यांनी जाहीर केले आहे.

दरम्यान, आता अमरावतीमध्ये महायुतीच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. कारण नवनीत राणांविरोधात उमेदवार उभा करण्याची तयारी बच्चू कडू यांच्याकडून सुरू आहे. आणि त्याचाच भाग म्हणून ठाकरे गटाते नेते दिनेश बुब आज प्रहार संघटनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे राणांविरोधात दिनेश बुब हेच प्रहारचे उमेदवार असतील असं दिसंतय. कडू यांनी दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद  बोलावलीय. त्यात ते कोणता निर्णय जाहीर करतात हे पाहावं लागणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल