पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे होणार बालदिन साजरा

पुणे : पिंपरी चिंचवड येथील सायन्स पार्क येथे 14 नोव्हेंबर रोजी पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिवस हा सायन्स पार्क आणि ‘टायनीबाँटस’ यांच्या संयुक्त विद्यमाने बाल दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. याअंतर्गत आयोजित कार्यक्रमांना मोफत प्रवेश देण्यात येणार असून पूर्व नोंदणी करणे आवश्यक आहे.

या कार्यक्रमांतर्गत रविवारी सकाळी 10 ते सायं. 4 या वेळेत मराठी विज्ञान परिषदेमार्फत ‘अंतराळ विज्ञानातील उगवता तारा’ शोध निबंधाचे सादरीकरण अंतिम फेरी, सकाळी 11 ते दुपारी1 दरम्यान रोबोटिक्स प्रात्यक्षिक व प्रदर्शन , दु. 2 ते 3 वा. गमतीशीर विज्ञान प्रयोग सादरीकरण, दु. 3 ते 4 वा. खुली विज्ञान प्रश्न मंजुषा, सायं. 6 ते 7.30 अत्याधुनिक दुर्बिणीतून आकाश दर्शनाची संधी या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहिती साठी भ्रमणध्वनी क्र. 9552994294/7744944333 तसेच [email protected] या ईमेलवर संपर्क करावा, असे पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळवले आहे.