अरे तू तुझी तब्येत सांभाळ, बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ – भुजबळ

Chhagan Bhujbal – राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप होत असल्याने ऐन थंडीत राज्यातील वातावरण तापले आहे. यातच आता मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी सभेतून (OBC Sabha) मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलाय. सरकार किती झुकणार जरांगेसमोर. त्याच्या पाया पडतायत, त्याला विनंती करतायत. सरकारला धमकी देणाऱ्यासमोर, जाळपोळ करणाऱ्या समोर तुम्ही झुकताय, असं म्हणत भुजबळांनी सरकारवर भाष्य केलं.

माध्यमांत दिलेल्या वृत्तानुसार, “माझा कार्यक्रम करतो, मला बघतो, 24 डिसेंबरला नाशिकला भुजबळ फार्म हाऊसवर या बघा काय होतं, आमंत्रण दिलं जातं. वा रे वा जरांगे काय तुझी हिंमत, अरे तू तुझी तब्येत सांभाळ. बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडन्या किडल्या त्या सांभाळ, मला धमकी देतो”, अशा खोचक शब्दांत मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना प्रत्युत्तर दिलं.

“हा जरांगे आपली लायकी काढतो. काहीही बोलतो. मला बोलतो, येवल्याचा यडपाट आहे. काय सांगायचं? एक म्हण आहे, आधीच मरकटं, त्यामध्ये मध्य प्याला. म्हणजे आधीच माकड त्यात बेवडा प्यायला. अरे आमची लायकी तू काय पाहतोस. माझ्याकडे एमपीएससीचा जो रिपोर्ट आहे, 106 मार्काला कट ऑफ आहे. ओबीसीचा कट ऑफ 106.5 ला आहे. आम्ही 0.5 ने पुढे आहे. धनगर समाजही 106.5 आहे. आमची लायकी नाही? आमची लायकी काढता. आमची मुलं हुशार आहेत”, असं प्रत्युत्तर छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना दिलं.

ओबीसी लढाई मी स्वतः साठी लढत नाही किंवा माझ्या घरच्या साठी लढत नाही. मच्या समाजाला कुठे आरक्षण मिळायला लागले आहे. मराठा समाजाला विरोध नाही आमचा विरोधा झुंड शाहिला आहे. आमचे घर जाळले. जाळपोळ करणाऱ्याला विरोध आहे. मराठा समाजाला द्या आमचा विरोध नाही. आगोदरचे कुणबी आम्हला मान्य आहे. काही कुणबी म्हूणन फिरतात आणि खोटे दाखले दिले जातात. आगोदर आमच आरक्षण भरा नंतर दुसऱ्यांना द्या. खोटे कुणबी घेऊन आलेत. जरांगे आमची लायकी काढतात येवल्याचा एडपट बोलतात. आगोदर मरकट आहे. बेवडा पिऊन किडन्या गेल्या, आमची लायकी काढतोय आमची मुलं हुशार आहेत असं म्हणत छगन भुजबळ यांची जरांगेंवर जहरी टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न?

जान्हवी कपूर आणि नीसा देवगण ‘या’ व्यक्तीसोबत लंडनमध्ये करत आहेत सुट्या एन्जॉय

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळंचं त्यांना पक्षानं हाकलून दिलं – महाजन