भाजपाचे पद म्हणजे जबाबदारी आणि अपेक्षा! नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे आवाहन

Chandrakant Patil BJP: भारतीय जनता पक्षाचे पद म्हणजे एक जबाबदारी आणि अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने त्या जबाबदारी आणि अपेक्षांचे योग्यप्रकारे निर्वाहन करावे; असा कानमंत्र नामदार चंद्रकांत पाटील यांनी दिला. तसेच आगामी २२ जानेवारी हा सर्वांसाठी आनंदोत्सवचा दिवस आहे. त्यामुळे या आनंदोत्सवची सर्व कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

भारतीय जनता पक्ष कोथरुड मंडल कार्यकारीणी नुकतीच जाहीर झाली. या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र वाटप आणि कार्यकर्ते मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नामदार पाटील बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, उपाध्यक्ष माधव भंडारी, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, शहर महिला मोर्चा अध्यक्षा हर्षदा फरांदे, कोथरूड मंडल दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर, खडकवासला मंडल अध्यक्ष गणेश वर्पे, भाजपा नेते सुशील मेंगडे, कोथरुड मंडल समन्वयक गिरीश भेलके, निवडणूक प्रमुख नवनाथ जाधव, सरचिटणीस गिरीश खत्री, दीपक पवार, प्रा. अनुराधा एडके, श्रीधर मोहोळ, सचिन पवार, उत्तर मंडलाच्या शरद भोते, सचिन दळवी, उमाताई गाडगीळ, विवेक मेथा, मोरेश्वर बालवडकर, काळुराम गायकवाड, कोथरुड मंडल महिला मोर्चा प्रभारी आणि मंडल सरचिटणीस मंजुश्री खर्डेकर, दक्षिणच्या महिला मोर्चा अध्यक्ष कांचन कुंबरे, उत्तरच्या अस्मिता करंदीकर, दक्षिणचे युवा मोर्चा अध्यक्ष अमित तोरडमल, उत्तरचे रोहन कोकाटे यांच्या सह नगरसेवक, शहर आणि मंडचे सर्वच प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्ष ही केवळ राजकीय संघटना नाही, तर सामाजिक संघटना म्हणून काम करते. त्यामुळे पक्षाचे पद हे केवळ पद नसून जबाबदारी आणि अपेक्षा आहे. ही जबाबदारी सांभाळत असताना कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर असले पाहिजे. तसेच संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न करणे ही पक्षाची रास्त अपेक्षा असते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील ही जबाबदारी आणि अपेक्षा योग्य पद्धतीने पार पाडाव्यात. त्यासाठी आवश्यक सर्वती ताकद पक्षाकडून दिली जाईल.

नामदार चंद्रकांत पाटील म्हणाले की, पक्षाचे संघटन वाढीसाठी आणि बूथ सक्षमीकरणासाठी सुपर वॉरियर्स ही संकल्पना राबविली आहे. माझ्याकडे ही या अनुषंगाने बूथची जबाबदारी असून, मी देखील यात सक्रीय आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देखील बूथ सशक्तीकरणावर भर दिला पाहिजे असे आवाहन केले.

नामदार पाटील पुढे म्हणाले की, अयोध्येतील प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारणीचे काम पूर्ण होऊन २२ जानेवारी रोजी रामचंद्रांची प्रतिष्ठापना होणार आहे. हा क्षण आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीचा आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे. या आनंदोत्सवसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे. त्यासाठी सर्वांनी जय्यत तयारी करावी अशी सूचना केली.

प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पक्षाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताना येणारी जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्यांसाठी महत्वाची असते. मला खात्री आहे; नवनियुक्त पदाधिकारी निश्चितपणे पूर्ण क्षमतेने, निष्ठेने पक्ष बांधणी आणि वाढीसाठी कार्यरत असतील, असा विश्वास व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ संदीप बुटाला यांनी केले. कोथरुड मंडल उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुराधा एडके यांनी केले.

महत्वाच्या बातम्या-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न?

जान्हवी कपूर आणि नीसा देवगण ‘या’ व्यक्तीसोबत लंडनमध्ये करत आहेत सुट्या एन्जॉय

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळंचं त्यांना पक्षानं हाकलून दिलं – महाजन