मला खासदार करण्यासाठी अब्दुल सत्तारांचा सिंहाचा वाटा – जलील

वैजापूर – 2019 मध्ये झालेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा असल्याचा गौप्यस्फोट खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. जलील यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

वैजापूरच्या खंडाळा येथे एका कार्यक्रमात बोलताना जलील म्हणाले की, ‘2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मला सत्तार यांची मोठी मदत मिळाली. त्यामुळे मला खासदार करण्यासाठी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचा सिंहाचा वाटा आहे.’ शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांची मदत मला मिळाली आणि माझ्या विजयी होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

सध्या शिवसेनेत आणि राज्यमंत्री असणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी त्या लोकसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस आमदार असून देखील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना मदत केल्याचं पुढं आल्यानं काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे.