जाणून घ्या कसबा पोटनिवडणूकीत अभिजीत बिचुकले आणि आनंद दवे यांना किती मते मिळाली ?

पुणे– कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. १८व्या फेरीअखेर काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांना ९ हजार २०० मतांची आघाडी मिळाली असून आता त्यांच्या विजयाची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. रवींद्र धंगेकरांनी तब्बल ११ हजार ४० मतांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा दारुण पराभव केला आहे. या विजयासह काँग्रेसने कसब्यातील भाजपाची २८ वर्षांची मक्तेदारी संपुष्टात आणली आहे.

पहिल्या फेरीपासूनच काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत. अठराव्या फेरीअंती रवींद्र धंगेकर यांना ६७,९५३ मते मिळाली. तर हेमंत रासने ५८,९०४ मतांसह पिछाडीवर आहेत. परिणामी तब्बल २८ वर्षांनंतर कसबा विधानसभा मतदारसंघ भाजपच्या हातातून निसटला आहे. दरम्यान, या निवडणुकीत अभिजीत बिचुकले यांना 47 तर हिंदू महासंघाचे आनंद दवे यांना अवघी 296 मते पडली आहेत.