‘केतकी ताई ने जे मांडले आहे ते काही सुजाण अथवा राजकीय विश्लेषक समजू शकतात’

पुणे – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा वादात सापडली आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांवर आक्षेपार्ह भाष्येत लिहिलेली पोस्ट शेअर केली आहे. या प्रकरणी तिच्या कळवा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. केतकी चितळेने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Ketaki Chitale Posted Poem on Facebook Against Sharad Pawar ) यांच्याविरोधात तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन वादग्रस्त कविता पोस्ट केली आहे. याप्रकरणी आता तिच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावरुन आता राष्ट्रवादी चांगलीच आक्रमक झाली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने आता तिला ट्रोल केले जाऊ लागले आहे.तिच्या या पोस्टवर अनेक स्तरांतून निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तर अनेकांनी यावर संतापही व्यक्त केला आहे. मात्र भाजपनेते प्रवीण अलई (Pravin Alai Reacted On Ketaki Chitale’s Post Against Sharad Pawar) यांनी आझाद मराठीला दिलेली प्रतिक्रिया लक्षणीय आहे.

ते म्हणाले, केतकी ताई ने केलेली अध्यात्मिक फवारणी म्हणावी लागेल. सध्या महाराष्ट्रात सरकार महाविकास आघाडी चे म्हणजे तीन पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस-शिवसेना मिळून आहे. मात्र मुख्यमंत्री जरी ठाकरे असले तरी मूळ मंत्री म्हणून जाणता राजा यांचाच असतो कार्यानुभार. त्यानुसार केतकी ताई ने जे मांडले आहे ते काही सुजाण अथवा राजकीय विश्लेषक समजू शकतात.असं त्यांनी म्हटले आहे.