पुण्यात आयकर विभागाची छापेमारी; पवारांचा निकटवर्तीय व्यक्ती रडारवर ?

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे निकटवर्तीय अनिरुद्ध देशपांडे (Anirudh Deshpande) यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयातून ही तपासणी केली जात असल्याची माहिती मिळाली आहे. सिटी ग्रुप हा पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एका आघाडीचा समूह आहे.याशिवाय अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवारांच्या जवळच्या वर्तुळातील असल्याने आयकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.