Ind vs Eng : इंग्लंडविरुद्ध होणार अश्विनची एंट्री; ‘या’ स्टार गोलंदाजाला मिळणार डच्चू 

India’s Predicted Playing XI Against England: भारतीय क्रिकेट संघ लखनौ येथील एकना क्रिकेट स्टेडियमवर रविवार, २९ ऑक्टोबर रोजी इंग्लंड विरुद्ध वनडे विश्वचषक २०२३ मधील सहावा सामना खेळेल. हार्दिक पंड्याची दुखापत आणि लखनौची फिरकी अनुकूल खेळपट्टी यामुळे भारतीय कर्णधार रोहित शर्माची प्लेईंग इलेव्हनबाबत चिंता वाढली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात आर अश्विनचा (R Ashwin) प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. अश्विनच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रवेश झाल्याने, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला खाली बसवले जाईल, जो स्पर्धेतील आतापर्यंतच्या पाचही सामन्यांपैकी प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. मात्र सिराजच्या बाहेर पडल्याने संघाचे वेगवान गोलंदाजी आक्रमण कमकुवत होऊ शकते, कारण संघात वेगवान गोलंदाज अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याचे खेळणेही निश्चित नाही. अशा स्थितीत कर्णधार रोहित शर्माला कुलदीप, अश्विन आणि जडेजा या तीन फिरकी गोलंदाजांसह लखनौच्या खेळपट्टीवर जाण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागू शकतो. कारण तीन फिरकीपटूंसह टीम इंडिया फक्त दोन वेगवान गोलंदाजांसह जाऊ शकणार आहे, ते म्हणजे जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.

हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव सहाव्या क्रमांकावर खेळणार आहे. तत्पूर्वी, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला प्लेईंग इलेव्हनमध्ये आणि मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूरला स्थान देण्यात आले होते. रोहित शर्मा लखनौमध्ये इंग्लंडविरुद्धही याच जोडीने खेळू शकतो. आता संघ कोणत्या बॉलिंग कॉम्बिनेशनसह मैदानात उतरणार याबाबत खेळपट्टी पाहून अंतिम निर्णय घेतला जाईल. संघाकडे 3 फिरकीपटू आणि 2 वेगवान गोलंदाज किंवा 2 फिरकीपटू आणि 3 वेगवान गोलंदाजांचा पर्याय असेल.

इंग्लंडविरुद्ध भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी.

महत्वाच्या बातम्या-

ऑस्ट्रेलियाच्या झंझावाती विजयाने पाकिस्तान विश्वचषकातून बाहेर जाण्याच्या मार्गावर ?

धक्कादायक ! ललित पाटीलला पुण्याबाहेर पळवण्यात ‘या’ व्यक्तीचा होता हात

इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी भारतासाठी चिंता वाढवणारी बातमी, हार्दिकच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट