IND vs ENG | टीम इंडियाच्या कॅम्पमधून मोठी बातमी; जसप्रीत बुमराह राजकोटमध्ये गायब? खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Jasprit Bumrah IND vs ENG Rajkot Test : भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील तिसरा कसोटी सामना गुरुवार 15 फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये (Rajkot Test) खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 बाबत आधीच अनेक गुंतागुंत निर्माण झाली होती. केएल राहुल संघाबाहेर असून श्रेयस अय्यरला संघातून वगळण्यात आले आहे. केएस भरतही फॉर्ममध्ये नाही, दरम्यान जसप्रीत बुमराहबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह संघासह राजकोटला पोहोचलेला नाही. मंगळवारी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) संघासोबत सराव सत्रातही भाग घेतला नाही. वर्कलोड मॅनेजमेंटमुळे बुमराहला यादरम्यान विश्रांती दिली जाऊ शकते, असे आधीच बोलले जात होते.

बुमराह संघात सामील होणार का?
आता या सामन्यात टीम इंडिया बुमराहला विश्रांती देण्याचा विचार करत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण एससीए (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन) आणि बीसीसीआयच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की बुमराह मंगळवारी रात्री संघात सामील होणार होता. बुमराह बुधवारी कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी संघासोबत सराव सत्रात सहभागी होऊ शकेल, अशी आशाही सूत्रांनी व्यक्त केली.

क्रिकबझने अलीकडेच आपल्या अहवालात माहिती दिली होती की बुमराहला यापूर्वी या सामन्यातून विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते. मात्र नंतर हा निर्णय बदलण्यात आला. आता त्याला भविष्यातील सामन्यांमध्ये विश्रांती दिली जाईल की नाही याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. 23 फेब्रुवारीपासून रांची येथे होणाऱ्या चौथ्या कसोटीत तो विश्रांती घेऊ शकतो, असे वृत्त आहे. पण याबाबतही ठोस माहिती नाही. मोठ्या बदलांबद्दल बोलायचे झाले तर सरफराज खानचे पदार्पण जवळपास निश्चित आहे, याशिवाय ध्रुव जुरेललाही संधी मिळू शकते.

बुमराह टीम इंडियाचे प्रमुख अस्त्र आहे
जसप्रीत बुमराह हा टीम इंडियाचे प्रमुख अस्त्र आहे यात शंका नाही. त्यानंतर तो सध्याच्या संघाचा उपकर्णधारही आहे. त्याने आतापर्यंत इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये 15 बळी घेतले आहेत. त्याने हैदराबादमध्ये 6 आणि विशाखापट्टणममध्ये 9 विकेट्स घेतल्या. त्याने विशाखापट्टणम कसोटीच्या पहिल्या डावात 6 विकेट घेत ब्रिटीशांना चकित केले. भारतीय चाहत्यांना आशा असेल की बुमराह खेळेल पण आता व्यवस्थापन काय निर्णय घेते हे पाहायचे आहे.

राजकोट कसोटीसाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सर्फराज खान, देवदत्त पडिक्कल, केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मुकेश कुमार, मोहम्मद कुमार, जसप्रीत बुमराह, आकाशदीप.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!