मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

Ashok Chavan Joins BJP : काँग्रेसचे मातब्बर नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज नांदेड येथील भाजपा कार्यलयात भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर स्वाक्षरी केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule), आशिष शेलार (Ashish Shelar), प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) हे उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाण यांनी असे काही म्हटले ज्यावरुन संपूर्ण कार्यालयात हशा पिकला. भाजपाशी हात मिळवल्यानंतर आभार व्यक्त करताना अशोक चव्हाण म्हणाले, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आशिष शेलार… असे म्हणताच फडणवीसांनी अशोक चव्हाण यांना टोकले आणि भाजपाचे काँग्रेसचे नव्हे (Ashok Chavan Joins BJP) असे म्हणत चूक सुधारली. हे ऐकल्यानंतर कार्यालयात सर्वत्र हशा पिकला. अगदी अशोक चव्हाणांनाही हसू आवरले नाही. त्यानंतर मात्र ५० वर्षांची सवय असल्याचे म्हणत अशोक चव्हाण यांनी आपल्या सारवासारव केली.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया