WTC 2023: टीम इंडियाचा ‘हा’ गोलंदाज डेव्हिड वॉर्नरसाठी धोकादायक ठरू शकतो

भारताने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश केला आहे. सिराजची आतापर्यंतची कामगिरी चांगलीच राहिली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू वॉर्नरला खूप त्रास दिला आहे. 

WTC 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जूनपासून लंडनमध्ये खेळवला जाईल. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भारताने वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश केला आहे. सिराजची आतापर्यंतची कामगिरी चांगलीच राहिली आहे. त्याने ऑस्ट्रेलियन खेळाडू वॉर्नरला खूप त्रास दिला आहे. आता पुन्हा एकदा दोन्ही खेळाडू अंतिम फेरीत आमनेसामने येऊ शकतात.

सिराज आणि वॉर्नर यांनी आतापर्यंत अनेक प्रसंगी एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले आहे. सिराजने वॉर्नरला खूप त्रास दिला आहे. सिराजच्या 70 चेंडूत वॉर्नर दोनदा बाद झाला आहे. यासह 55 चेंडू निर्धाव आहेत. सिराजने आयपीएलमध्येही आणि एकंदरीत या मोसमात त्याने प्रभावी गोलंदाजी केली. आता लंडनमध्ये अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंड मैदानात उतरणार आहे.

वॉर्नरसाठी हे वर्ष कसोटी फॉरमॅटसाठी खूप वाईट गेले. सिडनीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात त्याने फक्त 10 धावा केल्या. 11 चेंडूत 2 चौकार मारून तो बाद झाला. यानंतर तो भारताविरुद्धच्या नागपूर कसोटीच्या पहिल्या डावात केवळ 1 धावा काढून बाद झाला. दुसऱ्या डावात फक्त 10 धावा केल्या. या सामन्याच्या पहिल्या डावात वॉर्नरला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्रिफळाचीत केले. तर दुसऱ्या डावात रविचंद्रन अश्विनने त्याचा बळी घेतला. दिल्ली कसोटीतही तो शमीच्या चेंडूचा बळी ठरला.