Manoj Jarange पाटलांची तब्येत खालावली, नाकातून रक्तस्त्राव

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे. सगे सोयरे शब्दाच्या अमंलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत.

दरम्यान, मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत आहे. मात्र तरी देखील त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. सगे सोयरेची मागणी मान्य झाली, मात्र त्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. त्यासाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केलं आहे. न्यूज १८ लोकमतने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज सकल मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदला राज्यातील अनेक जिल्ह्यात संमिश्र असा प्रतिसाद मिळत आहे. जालना जिल्ह्यात मात्र कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!