INDIA Meeting : ‘…मोदींना चंद्रावर नाही, तर सूर्यावर पाठवा’; लालू प्रसाद यादवांचा टोला

India Alliance Meeting: इंडिया आघाडीची २ दिवसीय बैठक पार पडल्यानंतर आज मुंबईतील ग्रँड हयात हॉटेलमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत नेहमीप्रमाणे बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी आपल्या वक्तव्याने लक्ष वेधले. चांद्रयान-३ मोहिमेच्या यशावरुन लालू प्रसाद यांनी इस्त्रोचे कौतुक केले. तसेच यावेळी त्यांनी इस्त्रोला एक आवाहनही केले.

यादव यांनी बोलताना चांद्रयान-3 मोहिमेच्या (Mission Chandrayan 3) यशासाठी इस्रोच्या वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं. “या वैज्ञानिकांचा देशभरात गौरव होत आहे. व्हायलाही हवा. मला कोणीतरी म्हणालं, की आम्ही इस्रोच्या वैज्ञानिकांना एक आवाहन करत आहे. त्यांनी मोदींना (Narendra Modi) मागे न ठेवता, चंद्रावरच नव्हे तर सूर्यावरही पोहोचवलं पाहिजे.” असं यादव म्हणाले.

केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी उद्या गदर 2 सिनेमाचा खास शो

“यानंतर मोदींचं जगभरात नाव होईल. अमेरिका वगैरे सर्व देश आपल्या मागे पडतील. राहुल गांधी कित्येक देशांमध्ये फिरत असतात. तेदेखील पाहतील की मोदीजी कशा प्रकारे अमेरिकेत आणि जगभरात भारताचं नाव मोठं करत आहेत.” असेही लालू प्रसाद यादव यांनी म्हटले.