केंद्रिय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्यासाठी उद्या गदर 2 सिनेमाचा खास शो

मुंबई – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांच्यासाठी  उदया दि.2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता गदर 2 (Gadar 2) या सिनेमाचा खास शो अंधेरी पश्चिम येथील सिटी मॉल मध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी गदर 2 या सिनेमातील सर्व प्रमुख कलाकार आणि दिग्दर्शक अनिल शर्मा उपस्थित राहणार आहे.

PM Narendra Modi हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार?

गदर 2 सिनेमा मध्ये मुख्य नायकाची भुमिका साकारणारे अभिनेते उत्कर्ष शर्मा आणि अभिनेत्री सिमरत कौर आदि प्रमुख कलाकार उपस्थित राहणार आहेत. गदर 2 हा सिनेमा राष्ट्रभक्तीच्या विषयावर असल्यामुळे लोकप्रिय झालेला सिनेमा आहे. त्यामुळे या सिनेमाचा खास शो ना.रामदास आठवले यांच्यासाठी या सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी आयोजित केला आहे. अशी माहिती रिपाइं चे चित्रपट आघाडी चे किशोर मासूम यांनी दिली आहे.