Worlds First AI Teacher | शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी बदल! केरळच्या शाळेत मुलांना शिकवायला आली देशातली पहिली AI शिक्षिका, काय आहे तिची खासियत?

Worlds First AI Teacher : आजच्या काळात तंत्रज्ञानामुळे लोकांचे काम अधिकाधिक सोपे होत आहे. त्यामुळे तासन्तास लागणारे काम क्षणार्धात करता येते. रोबोट देखील माणसाची कामे उत्तम प्रकारे करत आहेत. हे रोबोट लवकरच शाळांमधील शिक्षकांची जागा घेऊ शकतात. याचे उदाहरण केरळमधून समोर आले आहे, जिथे देशातील पहिली महिला AI शिक्षिका लाँच करण्यात आली आहे. एआय शिक्षिकेला (Worlds First AI Teacher) वर्गात पाहून विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

खरं तर, केरळमधील तिरुअनंतपुरम येथील शाळेत एआय शिक्षिका ‘आयरिस’च्या आगमनाने शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांतिकारी बदल घडून आला आहे. MakerLabs Edutech कंपनीच्या सहकार्याने विकसित केलेल्या या AI शिक्षकाचे नाव Iris आहे. संपूर्ण देशाच्या शिक्षण व्यवस्थेसाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

कडुवायिल थंगल चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकाराने केटीसीटी उच्च माध्यमिक विद्यालयात या नवोपक्रमाचा वापर करण्यात आला आहे. आयरिस हा अटल टिंकरिंग लॅब (ATL) प्रकल्पाचा एक भाग आहे, जो 2021 चा NITI आयोग उपक्रम आहे, ज्याची रचना शाळांमध्ये अतिरिक्त क्रियाकलापांना प्रोत्साहन देण्यासाठी केली गेली आहे.

आयरिसला अनेक भाषा अवगत आहेत. आयरिस विविध विषयांतील जटिल प्रश्नांची उत्तरे देऊ शकते, ज्याचा फायदा मुलांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी होणार आहे. Iris हे रोबोटिक्स आणि जनरेटिव्ह AI चे संयोजन आहे. या रोबोटमध्ये इंटेल प्रोसेसर आणि एक को-प्रोसेसर आहे. ज्यामुळे विविध प्रकारच्या कमांडस हाताळत येणार आहेत. त्या कमांडद्वारे रोबोट सर्व काम करेल. आयरीसला चाके लावण्यात आली आहेत ज्यामुळे ती माणसासारखी हालचाल करू शकेल. आयरिसला तीन भाषांमध्ये बोलू शकते आणि कठीण प्रश्नांची उत्तरेही देऊ शकते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं