लहान ठेवीदारांना सर्वाधिक सुरक्षित करणारा भारत हा जगातील एकमेव देश – गोयल

पुणे – लहान ठेवीदारांना सर्वाधिक सुरक्षित करणारा भारत हा जगातील एकमेव देश असल्याचे गौरवोद्गार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या डिपॉझिटर्स फर्स्ट कार्यक्रमात बोलताना काढले.

पूर्वी बँक बुडाल्यानंतर ठेवीदारांना त्यांचे कष्टाचे पैसे कधी परत मिळतील याची शाश्वती नव्हती पण मोदी सरकारच्या धोरणामुळे रिझर्व्ह बँकेकडून संबंधित बँकेवर निर्बंध आल्यापासून केवळ 90 दिवसांच्या आत 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ठेवीदारांना परत करणं बंधनकारक करण्यात आल्याचं गोयल यांनी स्पष्ट केलं.

सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्क पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठ परिसरात भरवण्यात आलेल्या स्टार्टअपच्या प्रदर्शनालाही गोयल यांनी भेट दिली. कोविड परिस्थितीमुळे जगभरातील तंत्रज्ञानात मोठा बदल झाला. याचाच एक भाग असलेल्या ऑनलाईन शिक्षणामुळे जगभरातील ज्ञानाचं आदान-प्रदान होत असल्याने नवनवीन समस्यांवर तोडगा काढणं शक्य होत असल्याचं मत गोयल यांनी यावेळी व्यक्त केलं.