छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारणाऱ्या तरुणाला एक लाखाचे बक्षीस; विश्वजित देशपांडेंची घोषणा

वादग्रस्त वक्तव्ये करून चर्चेत राहण्यासाठी कुप्रसिद्ध असणारे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे. ब्राम्हण समाजात संभाजी आणि शिवाजी नाव ठेवत नाहीत, असं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना भुजबळ यांनी जातीयवादी टीका करत ते किती जातीयवादी आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ ?
“संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचं नाव मनोहर कुलकर्णी असून, लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जातो. खरेतर ब्राम्हण समाजाने वाईट वाटून घेऊन नये. पण, ब्राम्हण समाजात संभाजी, शिवाजी नाव ठेवत नाहीत. मात्र, मुद्दाम संभाजी भिडे हे नाव ठेवण्यात आलं,” अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

भुजबळांच्या या वक्तव्याचा समाचार घेत परशुराम सेवा संघ प्रदेशाध्यक्ष विश्वजित देशपांडे यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ यांच्या कानाखाली मारणाऱ्या तरुणाला विश्वजीत देशपांडे यांनी एक लाख रुपयाचे बक्षिस जाहीर केले आहे.

विश्वजित देशपांडे (Vishwajeet Deshpande) म्हणाले, “छगन भुजबळ यांनी हिंदू धर्मात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले आहे. त्यांनी सरस्वती देवीचाही अपमान केला आहे. मुळात छगन भुजबळ यांनी कोणाची पुजा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु ब्राम्हण समाजावर वारंवार अशा प्रकारची निच पातळीची विधाने करणे हे अत्यंत निषेधार्ह आहे. त्यांनी म्हटलं की, दीड टक्के ब्राम्हणांच्या हातात शिक्षणव्यवस्था होती. परंतु हा आकडाच त्यांनी कुठून आणला काय माहिती. खरे तर छगन भुजबळ यांना इतिहासाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.”

व्हिडिओ येथे पाहा-

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid02iYi1BsNNE9dRJ3ppo6Fnu5pRXUsvFbAXAETGn3MiBFWQchpZUzzfnoDngVsZgrpol&id=576558475&mibextid=Nif5oz

छगन भुजबळांचं म्हणण आहे की, ब्राम्हणांनी आम्हाला पुढे येऊ दिलं नाही. पण हे सरासर चुकीचं आहे. तुम्ही महात्मा फुलेंच्या नावाने धंदा करता. महात्मा फुलेंचं कार्य खरोखरच खूप मोठं आहे. पण भुजबळ ज्या पद्धतीने सातत्याने बोलतात ते चुकीच आहे. महात्मा फुलेंनी पुण्यात काढलेली पहिली मुलींची शाळा यासाठी भिडेंनी वाडा दिला. एमएटी नावाची संस्थाही तुम्ही ढापलीय, असे कडकडीत प्रत्युत्तर विश्वजीत देशपांडेंनी दिले. यावेळी आक्रमक झालेल्या देशपांडे यांनी जो तरुण छगन भुजबळ च्या कानाखाली मारेल त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देऊ, अशी घोषणाही केली.