कमालच म्हणावी! भीक मागून जमवली लाखोंची संपत्ती, भारतातील ५ सर्वात श्रीमंत भिकारींविषयी एकदा वाचाच

Top Five Richest Beggars: तुम्ही एका वर्षात किती कमावता आणि बचत करता? हे तुम्ही जगात कुठे आहात आणि तुमची जीवनशैली काय आहे यावर अवलंबून आहे. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की काही भिकारी तुमच्या- आमच्यापेक्षा जास्त कमावतात? तर तुम्हाला ऐकून विश्वास बसणार नाही. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की रस्त्यावर, स्टेशन्स आणि मार्केटमध्ये भिकारी दिसतात, त्यांच्यामध्ये अनेकजण आहेत ज्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. होय, हे अगदी खरे आहे. भारतात असे अनेक भिकारी आहेत, ज्यांनी फक्त भीक मागून लाखोंची संपत्ती जमवली आहे.

अशातच भारतातील अतिश्रीमंत भिकार्‍यांबद्दल जाणून घेऊया, ज्यांच्याकडे अपार्टमेंट आहेत, त्यांच्याकडे खूप मालमत्ता आहे आणि बँक बॅलन्स खूप आहे. मात्र तरीही ते रस्त्यावर भीक मागतात. इतके पैसे मिळवूनही त्यांनी भीक मागणे सोडलेले नाही.

5. अहवालानुसार, बिहारच्या पाटण्यातील रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागणार्‍या पप्पूचासुद्धा श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. अपघातात पाय फ्रॅक्चर झाल्यानंतर पप्पूने पाटण्याच्या रेल्वे स्थानकांवर भीक मागण्यास सुरवात केली. अहवालानुसार पप्पू कुमारकडे सुमारे 1.25 कोटींची संपत्ती आहे.

4. अहवालानुसार, भीक मागून जगणाऱ्या चंद्र आझादजवळ गोवंडीमध्ये घर, 8.77 लाख रुपये बँक खात्यात जमा आहे आणि जवळपास 1.5 लाख रुपये रोकड जमा आहे. 2019 मध्ये रेल्वे अपघातात प्राण गमावल्यानंतर तिची सर्व मालमत्ता मुंबई पोलिसांना शोधून काढली.

3. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर मुंबईत राहणाऱ्या गीताचे नाव येते. गीता मुंबईतील चर्नी रोडजवळ भीक मागते आणि त्या पैशातून तिने एक फ्लॅट खरेदी केला आहे ज्यात ती आपल्या भावासोबत राहते. भीक मागून ती दिवसाला सुमारे 1,500 रुपये मिळवते. एका महिन्यात तिचे उत्पन्न सुमारे 45 हजार रुपये आहे.

2. श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीत कोलकत्ताची लक्ष्मी दुसऱ्या क्रमांकावर आहे. लक्ष्मीने 1964 पासून कोलकातामध्ये वयाच्या 16 व्या वर्षी भीक मागण्यास सुरुवात केली आणि 50 पेक्षा अधिक वर्षांच्या आयुष्यात तिने भीक मागून लाखो रुपये जमा केले आहे. तिचे सर्व पैसे बँकांमध्ये जमा आहेत. भीक मागून लक्ष्मी अजूनही दररोज 1 हजार रुपये कमावते. महिन्याच्या हिशेबाने विचार केला असता ती दरमहा किमान 30 हजार रुपये कमावते.

1. देशातील सर्वात श्रीमंत भिकाऱ्यांच्या यादीमध्ये भारत जैनचे नाव पहिल्या क्रमांवर आहे. मुंबईच्या परळ भागात तो भीक मागतो. त्याच्याकडे मोठ्या अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट आहेत, ज्यांची किंमत प्रत्येक फ्लॅटसाठी 70 लाख रुपये आहे. म्हणजेच त्याच्याकडे एक कोटी 40 लाखांची मालमत्ता आहे. तो दरमहा सुमारे 75,000 भीक मागतो, जे भारतात नोकरी करणार्‍या व्यक्तीच्या पगारापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे.