‘हा’ जगातील अव्वल टेनिसपटू बनला इन्फोसिसचा ब्रँड अॅम्बेसेडर, 3 वर्षांसाठी करारबद्ध

देशातील आघाडीची आयटी कंपनी इन्फोसिसने जगातील अव्वल टेनिसपटू राफेल नदालसोबत (Rafeal Nadal) करार केला आहे. नदाल पुढील तीन वर्षांसाठी इन्फोसिसचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून काम पाहतील. इन्फोसिसने गुरुवारी नदालची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती जाहीर केली. एका निवेदनात याची घोषणा करताना इन्फोसिसने म्हटले आहे की, नदाल त्याच्या ‘इन्फोसिस डिजिटल इनोव्हेशन’ या ब्रँडशी तीन वर्षांसाठी अॅम्बेसेडर म्हणून संलग्न असेल.

नदालने डिजिटल सेवा कंपनीसोबत भागीदारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. इन्फोसिसने सांगितले की ते आणि नदालचे प्रशिक्षक संघ कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित सामना विश्लेषण साधन विकसित करण्यासाठी एकत्र काम करत आहेत. हे टूल नदालच्या संघाला त्यांच्या सामन्यांदरम्यान रिअल टाइममध्ये डेटाचे विश्लेषण करण्यास अनुमती देईल.

नदालने इन्फोसिससोबतच्या त्यांच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले, “कंपनी केवळ टेनिसच्या अनुभवात वाढ करण्यासाठीच नव्हे, तर आमच्या समुदायातील लोकांना उज्वल भविष्याचा भाग होण्यासाठी सक्षम बनवण्याचे काम करत आहे.” इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी नदालच्या तो जगातील सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक आहे असे सांगून कंपनीसोबतचा एक सन्मान आहे.