पाकिस्तानात इंटरनेट बंद; सोशल मीडिया प्लॅटफॉर्मही बंद

Internet server down in Pakistan – जगातील कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि भारताचा मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमला (Dawood Ibrahim) विष देऊन मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही वृत्तानुसार, दाऊद इब्राहिमला अज्ञात लोकांनी विष देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्याला पाकिस्तानातील कराची येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, दाऊद इब्राहिमला विषबाधा झाल्याचा कोणताही अधिकृत अहवाल समोर आलेला नाही.

असत्यापित सोशल मीडिया पोस्टनुसार, विष प्राशन केल्यानंतर दाऊद इब्राहिमची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. कडेकोट बंदोबस्तात त्यांना कराचीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉन आणि जिओ टीव्हीसह पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी अद्याप अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध केलेली नाही.

दरम्यान, दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याचं वृत्त समोर आल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानमध्ये इंटरनेट सर्व्हर डाऊन झाल्याची बातमी आहे. लाहोर, कराची, इस्लामाबाद यांसारख्या देशातील अनेक मोठ्या शहरांमध्येही सर्व्हर डाऊन आहेत. याशिवाय ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम देखील काम करत नाहीत, असा दावा केला जात आहे. नेटब्लॉक या जगभरातील इंटरनेट, सायबर सुरक्षा आणि डिजिटल गव्हर्नन्सवर देखरेख ठेवणाऱ्या संस्थेनं पाकिस्तानमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद असल्याचा दावाही केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न?

जान्हवी कपूर आणि नीसा देवगण ‘या’ व्यक्तीसोबत लंडनमध्ये करत आहेत सुट्या एन्जॉय

एकनाथ खडसेंनी पक्षात राहून चोऱ्या केल्या, त्यामुळंचं त्यांना पक्षानं हाकलून दिलं – महाजन