नऊ वर्षे आयपीएलपासून दूर राहिलेल्या खेळाडूवर तब्बल २४.७५ कोटींची बोली, ठरला सर्वात महागडा क्रिकेटर

IPL 2024 Auction Update: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग IPL च्या पुढील हंगामापूर्वी दुबईमध्ये एक मिनी-लिलाव आयोजित केला जात आहे. दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक खेळाडू श्रीमंत होतात.

दरम्यान ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) कोणत्या संघात जाणार याकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले होते. स्टार्कसाठी दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात मोठी चुरस झाली. दिल्लीने माघार घेतल्यानंतर केकेआरने यात उडी घेतली. मग गुजरात टायटन्सने देखील स्टार्कला खरेदी करण्यासाठी रस दाखवला. आकडा २० कोटीवर गेला तरी बोली चालू होती. केकेआरने अखेर तब्बल २४.७५ कोटीत स्टार्कला आपल्या संघाचा भाग बनवले. यासह स्टार्क आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू (Most Expensive Player In IPL History) ठरला आहे.

२०१६ साली मिचेल स्टार्कने त्याचा शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर दुखापत आणि देशाकडून क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देणे अशा कारणांमुळे स्टार्क आयपीएलपासून दूर होता. मात्र आता ९ वर्षांनंतर एवढी मोठी किंमत मिळवत स्टार्कने आयपीएलमध्ये धडाकेबाज पुनरागमन केले आहे.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत