हार्दिकने नाही धरला मुंबई इंडियन्सचा हात, गुजरातमध्येच राहणार कायम; खेळाडूंची यादी जाहीर

Gujrat Titans Retained And Released Players List: गुजरात टायटन्सने हार्दिकला रिटेन केल्याने हार्दिक पांड्याबाबत (Hardik Pandya) सुरू असलेली अटकळ रविवारी संपुष्टात आली. गुजरात टायटन्स (GT) ने IPL 2024 साठी कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. गुजरातने 8 खेळाडूंना सोडले आहे.

हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) परत जाण्याची शक्यता होती, पण तसे झाले नाही. गुजरातने त्याला कायम ठेवत सर्व अटकळांना पूर्णविराम दिला आहे. तथापि, ESPNcricinfo नुसार, ट्रेडिंग विंडो अजूनही खुली आहे, परंतु आता फक्त खेळाडू-टू-खेळाडू स्वॅप होऊ शकतात. गुजरात टायटन्सने यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ आणि दासून शनाका यांना सोडले आहे.

हा संघ सलग दोनदा फायनल खेळला आहे
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने दोनदा आयपीएल फायनल खेळली आहे. 2022 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सने आयपीएलचे विजेतेपद पटकावले. यानंतर ती आयपीएल 2023 मध्ये उपविजेती ठरली. 2023 मध्ये हार्दिक पंड्याचा संघ महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जकडून शेवटच्या चेंडूवर पराभूत झाला होता.

गुजरात टायटन्सच्या कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी
सोडलेले खेळाडू: अल्झारी जोसेफ, ओडियन स्मिथ, दासून शनाका, यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान

कायम ठेवलेले खेळाडू : डेव्हिड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, हार्दिक पंड्या, अभिनव मनोहर, बी साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशिद खान, जोश लिटल, मोहित शर्मा

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा