‘यापुढे कोणतीही जबरदस्ती मैत्री किंवा नाते असणार नाही’, रिषभ पंतचा रोख कुणाकडे?

Rishabh Pant Cryptic Post: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंतने शनिवारी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक संदेश पोस्ट केला. पंतने लिहिले- यापुढे कोणतीही जबरदस्ती मैत्री किंवा नाते असणार नाही. एकतर ती प्रगती करत राहते किंवा संपते.’ पंतने मेसेजमध्ये कोणाचाही उल्लेख केला नाही आणि चाहत्यांना अंदाज लावायला भाग पाडले आहे. पंत सध्या व्यावसायिक क्रिकेटपासून दूर आहे. डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या कार अपघातातून तो सावरत आहे.

सध्या दिल्ली कॅपिटल्स (डीसी) क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांनी नोव्हेंबरच्या सुरुवातीला पंतच्या प्रकृतीबद्दल मोठे अद्यतन दिले होते. पंत आयपीएल 2024 मध्ये खेळताना दिसेल, असे आश्वासन गांगुलीने दिले होते. दिल्ली कॅपिटल्सच्या काही खेळाडूंनी आयपीएल 2024 साठी त्यांचे प्रशिक्षण सुरू केले आहे, परंतु पंत संघासोबत सराव करत नाहीये. गांगुली 10 नोव्हेंबरला म्हणाला- पंत आता ठीक आहे. तो आयपीएलच्या पुढील मोसमात खेळणार आहे.

तो म्हणाला- मात्र, पंत कोलकात्यात सराव करत नाहीये. सरावासाठी मैदानावर उतरण्यासाठी त्याला अजून वेळ आहे. तो जानेवारी (2024) पर्यंत बरा होईल. गांगुली म्हणाला, ‘आम्ही संघाबद्दल बोलत होतो. तो कर्णधार आहे, त्यामुळे आगामी लिलावाबाबत त्याने आपले मत व्यक्त केले आहे. त्यामुळेच संघाशी संबंधित काही बाबींना अंतिम रूप देण्यासाठी तो येथे (कोलकाता) आला आहे.’

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार पंत याच्या कारला गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अपघात झाला होता, जेव्हा ती डिव्हायडरला धडकली आणि आग लागली. मात्र, पंत योग्य वेळी गाडीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाला. पंत 2023 च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाचा भागही नव्हता कारण तो मेगा इव्हेंटसाठी वेळेत बरा होऊ शकला नाही. चाहते पंतच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

आगामी टी२० विश्वचषकात हार्दिक पंड्याकडे नेतृ्त्व देऊ नये, ‘हा’ खेळाडू असेल सर्वोत्तम पर्याय

अमिताभ बच्चन यांनी मुलीला भेट दिला ५६ कोटींचा बंगला, आता ‘बिग बी’ कुठे राहणार?

दादासमोर नाक उचलून…; रुपाली चाकणकरांचा कवितेतून सुप्रिया सुळेंवर निशाणा