Dilip Mohite Patil | “..तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते”, मोहिते पाटलांची पवारांवर जहरी टिका

Dilip Mohite Patil | राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शिरूरमध्ये पहिल्यांदाच दोन्ही पवारांमध्ये हाय व्होल्टेज सामना बघायला मिळत आहे. अजित पवारांकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील तर शरद पवारांकडून अमोल कोल्हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आता दोन्ही बाजूच्या गटाकडून एकमेकांवर जोरदार टिका टिप्पणी केली जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या शिरूरमध्ये राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून येत आहे.

अजितदादा गटातील आमदार दिलीप मोहिते पाटील (Dilip Mohite Patil) यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. कांद्याचे, दुधाचे दर कोसळण्याला थेट शरद पवारांना जबाबदार धरलं आहे. शरद पवारांनी केंद्रीय कृषी मंत्री असताना एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू दिसले नसते. अशी घणाघाती टिका मोहिते पाटलांनी शरद पवारांवर केलीय.

यावेळी दिलीप मोहिते पाटील म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री होते. तेव्हा त्यांनी एक कायदा केला असता तर आज शेतकऱ्यांची ही अवस्था झाली नसती. तुम्ही कधीही लोकप्रतिनिधी म्हणून आमच्यासोबत बसून चर्चा केली नाही. आज ती चर्चा केली असती तर शेतकरी चांगलाच सुखावला असता, असेही म्हटलंय.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब