मंगेशकर कुटुंबियांनी पहिला लता मंगेशकर पुरस्कार नरेंद्र मोदींना दिला यात आश्चर्य काय? – वागळे

मुंबई – पहिला ‘लता मंगेशकर पुरस्कार’ (Lata Mangeshkar Award) पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendera Modi)  यांना जाहीर झाला आहे. नरेंद्र मोदींना या पुरस्काराने 24 एप्रिलला मुंबईत सन्मानित करण्यात येणार आहे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल (shanmukhanand hall) येथे या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उषा मंगेशकर यांच्या हस्ते ‘लता दिनानाथ मंगेशकर’ हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात येणार आहे. मनोरंजन, क्रीडा, सामाजिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर पत्रकार निखील वागळे (Nikhil Wagale) यांनी केलेलं एक ट्वीट चांगलाच चर्चेचा मुद्दा बनलं आहे. मंगेशकर कुटुंबियांनी पहिला लता मंगेशकर पुरस्कार नरेंद्र मोदींना दिला यात आश्चर्य काय? त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार! असं वागळे यांनी म्हटले आहे.