मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर यांचे निधन, चार वेळा राहिले होते मिस्टर इंडिया

आज (१९ जुलै) शरीरसौष्ठव क्षेत्रातून अत्यंत वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठमोळे बॉडीबिल्डर आशिष साखरकर (Ashish Sakharkar) यांचे आजारपणामुळे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिस्टर इंडिया, मिस्टर युनिव्हर्स, महाराष्ट्र श्री यासारखे अनेक मानाचे किताब आशिष यांनी पटकावले होते. आशिष हे चार वेळा मिस्टर इंडिया विजेते, चार वेळा फेडरेशन कप विजेता, मिस्टर युनिव्हर्स रौप्य आणि कांस्य, मिस्टर आशिया रौप्य, युरोपियन चॅम्पियनशिप, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त होते. त्यांनी परदेशातही आपल्या नावाचा डंका वाजवला होता. आशिष यांच्या निधनानंतर त्यांना महाराष्ट्रभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.